आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा काही पोरखेळ नाही, भाजपची देशभक्ती घोषणेपूरती- सोनियांचा हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी दिल्लीत प्रचारसभेला संबोधित केले. काँग्रेस अध्यक्षांनी प्रथमच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल यांचे नाव न घेता त्या म्हणाले, 'काही लाकांना असे वाटत आहे, की सरकार चालवणे पोरखेळ आहे. मात्र, ते एवढं सोपं काम नाही. दिल्लीत असे लोक मैदान सोडून पळून गेले.' यासोबतच त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपसाठी देशभक्ती फक्त घोषणा आहे. त्या म्हणाल्या, निवडणूक दोन विचारांमध्ये होणार आहे. एक समाजाला जोडणारी विचारधारा आणि दुसरी समाजामध्ये दुही निर्माण करणारी. भाजप समाजामध्ये दुफळी निर्माण करणारे विचार पसरवत आहे.
याआधी आसाममधील लखीमपूर येथे त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
दिल्लीतील सभेत सोनियांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तेसच यूपीएच्या दोन्ही कार्यकाळातील जमेच्या बाजू जनतेसमोर मांडल्या.
भाजपवर निशाणा साधतानाच सोनिया गांधी धर्मनिरपेक्षतेवर जोर देऊन बोलल्या. त्यांनी सच्चर कमिटीच्या शिफारसी लागू करणे, माहितीचा अधिकार आणि इतर कामांची माहिती दिली. तसेच विरोधी पक्षाने सकारात्मक साथ दिली असती तर अनेक चांगले कायदे मंजूर करता आले असते, असेही त्या म्हणाल्या.

पुढील स्लाइडमध्ये, विरोधक द्वेषाचे व्यापारी