आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांच्‍या वाढदिवसावर कॉंग्रेसच्‍या पराभवाची छाया, पाहा काही खास छायाचित्रे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉंग्रेसचा चार राज्‍यांमध्‍ये पराभव झाला आहे. निराशेच्‍या वातावरणातच कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी यांचा वाढदिवस आला आहे. आज (सोमवार) त्‍यांचा 66 वा वाढदिवस आहे. त्‍यांनी कोणतेही सेलिब्रेशन न करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यातच निवडणुकीतील पराभवाचे शल्‍यही त्‍यांना बोचत आहे. पराभवामुळे त्‍या आता स्‍वतः आगामी लोकसभा निवडणुकीची सुत्रे पूर्णपणे स्‍वतःच्‍या हाती घेण्‍याची शक्‍यता आहे.

सोनिया गांधींचा जन्‍म 9 डिसेंबर 1946 ला इटलीतील लुसियाना येथे झाला. त्‍या 1997 मध्‍ये कॉंग्रेससोबत थेट जुळल्‍या. त्‍यानंतर त्‍या 1998 मध्‍ये कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष झाल्‍या. स्‍वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचे अध्‍यक्षपद भूषविणा-या त्‍या पहिल्‍या परदेशी महिला ठरल्‍या आहेत. सोनियांची गणना जगातील सर्वात सामर्थ्‍यशाली महिलांमध्‍येही होते. फोर्ब्‍स मॅगझिनने त्‍यांना या यादीत तिसरे, 2007 मध्‍ये सहावे आणि 2010 मध्‍ये नवव्‍या स्‍थानी होत्‍या.

राजकारणात जय-पराजय सुरुच राहते. आज सोनियांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्‍यांना शुभेच्‍छा आहेच. या बातमीत पाहू या त्‍यांच्‍या आयुष्‍यातील काही खास क्षण छायाचित्रांच्‍या माध्‍यमातून...