आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेचा निकाल यापेक्षा वेगळा असेल, पराभवानंतर सोनिया गांधीची प्रतिक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारून पराभव झाला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान मध्ये भाजप सत्तास्थापन करण्याच्या स्थितीत आहे. या निकालवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'जनतेने दिलेला कौल मान्य आहे. विजयी पक्षाचे स्वागत करते', या शब्दात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चारही राज्यातील पराभव मान्य केला आहे. त्यासोबतच यामुळे पक्ष निराश असल्याचेही त्या म्हणाल्या.
वाढती महागाई पराभवाचे एक कारण असले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. त्यासोबतच, काँग्रेसच्या वतीने प्रथमच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल असे सांगितले गेले आहे. सोनिया गांधी म्हणाल्या योग्य वेळी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. ते नाव राहुल गांधी किंवा दुसरे कोणाचेही असू शकते. असेही त्या म्हणाल्या.

'विधानसभा निवडणूकीत स्थानिक प्रश्नांना महत्त्व दिले जाते तर, लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय मुद्दे महत्त्वाचे असतात. पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जाईल', असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेचा निकाल यापेक्षा वेगळा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या निवडणूकीच्या माध्यमातून जनतेने आम्हाला एक संदेश दिला आहे आणि तो मी समजून घेतला आहे. आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत. शीला दीक्षित यांनी चांगले काम केले होते. त्यांच्या सरकारने चांगले काम केले होते असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवातून जनतेचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचला असल्याचे म्हटले आहे.