आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांना हवी देशभरात अंत्योदय योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अंत्योदय योजनेला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभर ही योजना त्वरित लागू करण्यावर भर दिला आहे. सोनिया म्हणाल्या, मध्य आणि ईशान्य भारतात त्याची लवकर अंमलबजावणी केली जावी. या योजनेच्या माध्यमातून अनेक राज्यांनी महिला स्वयंसहायता गटामार्फत आर्थिक, सामाजिक बदल घडवता येतो हे दाखवून दिले आहे. या वर्षअखेरीस पाच राज्यांत होणार्‍या निवडणुका व आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यूपीए सरकारने गरिबी निर्मूलन कार्यक्रमावर भर दिला आहे.

राष्ट्रीय अंत्योदय योजनेला दोन वष्रे पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी आयोजित कार्यक्रमात सोनिया बोलत होत्या. महिला आणि कमकुवत वर्गांचे सबलीकरण करणे हा यूपीएचा मुख्य कार्यक्रम आहे. येत्या दहा वर्षांत सात कोटी कुटुंबांची गरिबीतून मुक्तता करायची आहे. मात्र, हे काम तेवढे सोपे नाही, असे गांधी म्हणाल्या.