आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 1998 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुखपदाची खुर्ची ताब्यात घेतली होती. आज त्याला 15 वर्षे पूर्ण होत झाली आहेत. आजचा दिवस सोनिया गांधींसह संपूर्ण गांधी परिवार आणि काँग्रेस पक्षासाठी एका उत्सवासारखा आहे. सोनिया गांधी यांनी इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वांधिक कार्यकाळ संभाळण्याचा विक्रम केला आहे.
सोनिया गांधी यांचे मागील 15 वर्षांतील नेतृत्व काँग्रेस पक्षासाठी 'करिश्माई' राहिले असल्याचे काँग्रेसी नेते मानतात. 2004 मध्ये पंतप्रधानपद नाकारुन सोनिया यांनी महान त्याग केल्याचे पक्षातील नेते सांगतात. मात्र सोनिया गांधी यांच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीवर आज नजर टाकली तर काही प्रश्न नक्कीच पडतात.
सोनियांचे करिश्माई नेतृत्त्व आणि त्यांनी केलेला त्याग यानंतरही काँग्रेस पक्षाचे देशातील विविध प्रदेशातून दिवसेंदिवस पक्ष संघटना कमकुवत होत चालल्याचे दिसून येते. एक देश म्हणून भारत स्वातंत्र्यापासूनच संघर्ष करीत आला आहे. तरी मागील 15 वर्षांत हा संघर्ष कमी होणे अपेक्षित असतानाही तो संघर्ष आजही कायम असल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी राहण्याचा विक्रम केला असला तरी खालील 5 कमतरता सोनिया गांधी दूर करु शकल्या नाहीत. सोनियांनी काँग्रेस पक्षाची कमान संभाळण्याला 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुढे स्लाइडद्वारे वाचा, जे मुद्दे आणि समस्या ज्या सोनिया गांधींही दूर करु शकल्या नाहीत...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.