आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधींनी पाठवलेले ट्रक रस्त्याच बंद; चालकांवर साहित्य विकण्याची वेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्‍तराखंडातील महाप्रलयातील पीडितांना वाचवण्यासाठी भारतीय जवान जीवाची बाजी लावत आहेत. परंतु लोकांना वाचवण्याचे श्रेय लाटण्‍यावरून देशातील राजकीय नेते दंग आहेत. कॉंग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाच्या दोन खासदारांमध्ये हाणामारी काल (बुधवारी) जगजाहीर झाली होती. दुसरीकडे कॉंग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी उत्‍तराखंडमधील पीडितांसाठी पाठवलेले ट्रक रस्त्यातच बंद पडले आहेत. काही ट्रकमधील डिझेल संपल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ते रस्त्यावरच उभे आहेत. चालकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.

ट्रक चालकांची व्यथा ऐकायला हायकमांडकडे वेळ नसल्यामुळे चालकांवर ट्रकमधील साधन सामुग्री विकण्‍याची वेळ येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

हेमकुंड पुल कोसळला
राष्‍ट्रीय महामार्गा 58 वर असलेला हेमकुंड पुल कोसळला आहे. त्यामुळे वाहने रोकण्यात आली आहे. दोरखंडच्या साहायाने लोकांना नदी पार करावी लागत आहे. पंजाब पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.