आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi Led Congress To Stage March Against Intolerance

#Intolerance: मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा, राष्ट्रपतींना दिले निवदेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेविरोधात काँग्रेसने मंगळवारी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला आहे. संसद भवनासमोरील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोरुन मोर्चाला सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, उपाध्यक्ष राहुल गांधींसह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले.कडक सुरक्षेत काढण्यात आलेल्या या मोर्चात नेत्यांच्या हातात मोदी सरकारविरोधातील फलक होते. मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा राष्ट्रपती भवनाकडे गेला. तिथे शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवदेन दिले.
काय म्‍हणाल्‍या सोनिया ?
राष्ट्रपतींची भेट घेतल्‍यानंतर सोनिया गांधी म्‍हणाल्‍या, '' ज्‍या घटना आज होत आहेत. त्‍या जाणीवपूर्वक घडवल्‍या जात आहेत. या घटनांशी संबंधित लोक हे मोदी सरकारशी जुळलेले आहेत. या निवेदनातही हे चिंताजनक विषय मांडले आहेत. कॉंग्रेस पार्टी या प्रवृत्‍तींचा पूर्ण शक्‍तीने विरोध करणार आहे.''
राहुल काय म्‍हणाले ?
राहुल गांधी म्‍हणाले, '' देशात लेखकांचे खुन होत आहेत. पण पंतप्रधान यावर एक शब्दही बोलत नाहीत. देशात बिघडलेल्‍या वातावरणाने लोकांमध्‍ये चिंता आहे. त्‍यांचे मंत्री म्‍हणतात की, देशात सर्वकाही ठीक आहे. या घटनांच्‍या मागे आरएसएस आणि बीजेपीचे लोक आहेत.''
काँग्रेसने महात्मा गांधींना नथुराम गोडसेने ज्या ठिकाणी गोळ्या मारल्या त्या ठिकाणाहून मोर्चाची परवानगी मागितली होती. दिल्ली पोलिसांनी तशी परवानगी नाकारली. त्यानंतर संसदभवनापासून मोर्चा काढण्याचे ठरले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोर्चाचे फोटो.......