आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi News In Marathi, Congress, Divya Marathi

मुख्यमंत्री हुडा यांचे सोनियांना ब्लॅकमेल, माजी खासदाराचा सनसनाटी आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रॉबर्टवढेरांच्या वादग्रस्त जमीन प्रकरणात हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना ब्लॅकमेल करत असून त्यामुळेच त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचली, असा सनसनाटी आरोप माजी खासदार अवतारसिंग भडाना यांनी बुधवारी केला. भडाना यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया, हुडा यांच्यावर निशाणा साधत पक्षत्याग केला. त्यांनी राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला आहे.

चार वेळा आमदारपद भूषवलेल्या भडाना यांची गुजराती समाजामध्ये मोठी पकड आहे. हुडा यांच्याविरुद्ध पुरावे देऊनही सोनियांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप भडाना यांनी केला आहे. आम्ही जे काही सांगत होतो त्यावर त्यांनी सहमती दर्शवली होत, पण कारवाई का केली नाही हे समजले नाही, असे भडाना म्हणाले. सोनिया यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या वादग्रस्त जमीन प्रकरणात हुडा पक्षश्रेष्ठींना ब्लॅकमेिलंग करत असल्याचा आरोप भडाना यांनी केला. हुडा यांनी निर्माण केलेल्या िस्थतीमुळे अनेक नेते पक्ष सोडण्याचा मार्गावर असल्याचा दावा त्यांनी केला.
आमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना पक्षात सन्मान नाही. राव इंद्रजिसिंग, िबरेंद्रसिंग यांनी यामुळेच पक्ष सोडला. राहुल आणिसोनिया गांधी यांच्या जवळच्या नेत्यांचा हुडा यांच्यावर प्रभाव आहे. पक्ष यामध्ये लक्ष घालेल असे वाटले होते, मात्र त्यांनी हुडा यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याचा निर्णय घेतला नाही. काँग्रेसमध्ये मी दीर्घकाळापासून काम केले, पण आता ती काँग्रेस रािहली नाही. हरियाणा िशरोमणी गुरुद्वारा समितीच्या वादग्रस्त दंगलीमागे हुडा यांचा हात असल्याचा आरोपही भडाना यांनी केला आहे.