आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi News In Marathi, Congress, Rajiv Gandhi, Divya Marathi

भाजपने खोटी स्वप्ने दाखवली, लोक त्यांच्या जाळ्यात अडकले - सोनिया गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपने खोटी स्वप्ने दाखवली व लोक त्यांच्या जाळ्यात अडकले, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महिला मेळाव्यात सोनिया बोलत होत्या. हा दिवस काँग्रेसच्या वतीने संकल्प दिन म्हणून साजरा केला जातो.

नरेंद्र मोदी यांचे सरकार यूपीए सरकारच्याच योजनांची नक्कल करून त्याचे श्रेय लाटत आहे. यूपीए सरकारने भरपूर चांगली कामे केली. पण देशातील जनता भाजपच्या खोट्या स्वप्नांना बळी पडले आणि आमची चांगली कामे दुर्लक्षित झाली. असे असले तरीही काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

सध्या सत्तेत असलेले लोक सवयीप्रमाणे देशापुढे वेगळे चित्र निर्माण करत आहेत आणि काँग्रेसने सुरू केलेल्या योजना आपल्याच योजना असल्याचे भासवत आहेत, असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.

आई-बहीण म्हणणारे छेड काढतात : राहुल
तुम्हाला आई-बहीण म्हणतात, मंदिरात जातात, पूजा करतात तेच बसमध्ये छेड काढतात. कायदे करून समाज बदलत नाही. विचाराची पद्धत बदलावी लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.