आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sonia Gandhi , Rahul Gandhi Delhi Court Notice, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनियांसह राहुल गांधींना कोर्टाचे समन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने 'नॅशनल हेरॉल्ड'च्या गैरव्यवहारप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले. दोघांना सात ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचेही आदेश दिले आहेत. सोनिया गांधी यांना समन्समध्ये आरोपी म्हणूनच संबोधिण्यात आले आहे.
सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या शिवाय मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस आरि सॅम पित्रोदा यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र होते. चार वर्षांपूर्वीच ते बंद पडले. मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट गोमती मनोचा यांनी हे समन्स बजावले आहे. या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या व्यक्तींच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे जात असल्याचे नमूद मनोचा यांनी नमूद केले आहे. सोनिया गांधी यात दोषी आढळून आल्यास त्यांना सात वर्षींची कारावासाची शिक्षा होऊ शकते.

1938 मध्ये 'नॅशलन हेरॉल्ड' या वृत्तपत्राची स्थापना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यांनी केली होती. 2008 मध्ये हे वृत्तपत्र बंद पडले. 'यंग इंडियन' या खासगी कंपनीने 'नॅशनल हेरॉल्ड'चे खरेदी केले होते. 'नॅशनल हेरॉल्ड'ला नवी कंपनी बनवून खरेदी केल्याप्रकरणी भाजपचे नेते सुब्रमण्यम यांनी कोर्टात धाव घेतली. विशेष म्हणजे या खरेदी व्यवहारात कॉंग्रेसचा निधी वापरण्यात आल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे 'यंग इंडियन कंपनीचे संचालक आहेत. दोघांचे या कंपनीत 76 टक्के शेअर्स आहेत. तसेच उर्वरित शेअर्स कॉंग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नाडिस यांचे आहेत. 'नॅशनल होरॉल्ड'च्या खरेदी व्यवहारात कॉंग्रेसने मोठा विश्वासघात केल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.

(फाइल फोटो- कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी)