आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'24 अकबर रोड\'नुसार सोनिया गांधी 2016 मध्ये राजकारणातून निवृत्त होणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी 2016 मध्ये राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा दावा पत्रकार-लेखक रशीद किडवई यांनी आपल्या '24 अकबर रोड' या पुस्तकातून केला आहे. सोनिया गांधी 2016 मध्ये 70 वर्षांच्या झाल्यानंतर त्या राजकारणातून बाहेर पडतील. तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवतील, असा खुलासाही किडवई यांनी केला आहे.

किडवई यांनी पुस्तकात लिहिले आहे, की सोनियांनी राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा मोजक्याच नेत्यांसमोर व्यक्त केली होती. सोनियां यांनी 9 डिसेंबर 2012ला आपल्या वाढदिवशी आपली इच्छा जाहीर केली होती. मात्र सोनियांची इच्छा ऐकून कॉंग्रेस नेते सुन्न झाले होते.

राहुल गांधीना मोठी जबाबदारी देण्याचा मानस सोनियांनी त्यावेळी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवला होता. त्यामुळे राहुल यांना कॉंग्रेसचे महासचिवपदावरून उपाध्यक्षपद देण्यात आले होते. उल्लेखनिय म्हणजे देशाचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंह यांनी राहूल यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचेही आमंत्रण दिले आहे.