आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता नाही : सोनिया गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशात मुदतपूर्व लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. आगामी निवडणुकांतही संपुआ सरकारचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शनिवारी नॅशनल मीडिया सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या, आमच्या सरकारने लोकांना अनेक प्रकारचे अधिकार दिले आहेत. यात माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि आता अन्नाच्या अधिकाराचा समावेश आहे. अन्नसुरक्षा आणि भूसंपादनासारखी ऐतिहासिक विधेयके संमत झाल्यानंतर काँग्रेस निवडणुका घडवून आणेल का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, याबाबतीत आताच काही सांगता येणार नाही. पत्रकारांनी हा प्रश्न वारंवार विचारला असता त्यांनी सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत सत्ता राखण्याचा आम्हाला विश्वास आहे.