आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Was Miffed When Told Indira Favoured Priyanka: M L Fotedar

\'इंदिरा गांधींना राहुल नव्हे तर प्रियंकांमध्ये दिसत होती उत्तराधिकारी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय राहिलेले एम.एल. फोतेदार यांनी दावा केला आहे, की इंदिरा गांधी यांना त्यांची उत्तराधिकारी प्रियंका व्हावी अशी इच्छा होती. फोतेदार यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात याचा खुलासा केला आहे. त्यासोबतच इंदिरा गांधींना त्यांचा शेवट जवळ आला आहे, असे हत्येआधीच वाटायला लागले होते. असेही पुस्तकात म्हटले आहे.

आणखी काय आहे पुस्तकात खळबळजनक
इंग्रजी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानूसार, फोतेदार यांनी पुस्तकात म्हटले आहे, की ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरांनी काश्मीरचा दौरा केला होता. तिथे त्या एका हिंदू आणि एका मुस्लिम धार्मिकस्थळी गेल्या होत्या. हिंदू मंदिरात इंदिरा गांधींनी असे काही पाहिले की त्यांना वाटायला लागले की आपले जीवन आता शेवटाच्या जवळ आले आहे. त्यानंतर बऱ्याच विचारांती त्यांनी असे म्हटले होते, की प्रियंकाला राजकारणात मोठे यश मिळू शकते आणि बराच काळ ती सत्ते राहू शकते.
इंदिरा गांधींना स्वतःचा अंत जवळ आल्याचे कसे कळाले
>> फोतेदार यांनी पुस्तकात म्हटले आहे, की इंदिरा गांधींनी मंदिरात एक सुकलेले झाड पाहिले होते. त्याचा अर्थ त्यांनी, आपले जीवन आता अंताच्या जवळ आले असल्याचा काढला होता.

>> फोतेदार म्हणाले, इंदिरांना कळाले होते की माझ्या नजरेतूनही ती गोष्ट सुटलेली नव्हती. रेस्ट हाऊसकडे जातांना त्यांनी मन मोकळे करत या गोष्टीचा उल्लेख केला होता.

>> राजीव गांधी यांच्या हत्येनंतर फोतेदार यांनी सोनियांना एक पत्र लिहून इंदिरा गांधींच्या विचारांबद्दल माहिती दिली होती.

फोतेदार यांच्या पुस्तकाचे नाव 'चिनार लीव्स' (चिनाराची पाने) आहे. त्यात ते माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंह यांच्या दाव्याचे समर्थन करताना दिसतात. नटवरसिंहांनी दावा केला होता की, 'अंतर आत्म्याचा आवाज' ऐकून नाही तर कुटुंबाच्या दबावामुळे सोनिया गांधींनी 2004 मध्ये पंतप्रधान पदाला नकार दिला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नातवांसोबत इंदिरा गांधींचे फोटोज्..