आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदृढ शरीरात दिसू लागले सोनोग्राफीमध्ये मुतखडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझियाबादच्या पुष्पांजली रुग्णालयाच्या दिल्ली शाखेत एका महिलेवर गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतरच्या अल्ट्रासाउंड तपासणीत तिच्या गॉल ब्लॅडरमध्ये खडा असल्याचे निदर्शनास आले. तो काढण्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. नातेवाइकांनी सेकंड ओपिनियनचा आधार घेत वेगवेगळ्या सेंटरमधून सोनोग्राफी केली. सगळीकडे अहवाल सामान्य आला.

संबंधित कुटुंबाने त्यानंतर दिल्ली ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनावर दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, कोलकात्यात शिडीवरून पडून जखमी झालेल्या ताराचे भाग्य आडवे आले. डॉक्टरांनी तिच्या पायाची सोनोग्राफी केली तेव्हा पृष्ठभागाचे हाड तुटल्याचे कारण देत शस्त्रक्रिया केली. मात्र, वेदना तर टाचेत होत्या, असे लक्षात आले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

अल्टासाउंडच्या चुकीच्या अहवालामुळे आयुष्याचा खेळ करणार्‍यांपैकी हे एक उदाहरण आहे. दिल्लीच्या बीएलके रुग्णालयात रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रेम कुमार यांच्या म्हणण्यानुसार देशातील बहुतांश लहान नर्सिंग होम आणि अल्ट्रासाउंड सेंटर खूप घातक ठरत आहेत. 4-5 लाख रुपयांच्या मशीनमधून रुग्णांची सोनोग्राफी केली जात आहे.
आमच्या रुग्णालयात अशा अनेक रुग्णांचे चुकीचे सोनोग्राफी अहवाल उघड झाले आहेत. मॅक्स हेल्थकेअरचे प्रमुख रेडिओलॉजिस्ट डॉ. भारत अग्रवाल म्हणाले, सोनोग्राफी मशिन्सच्या स्क्रीनमध्ये फरक असला, तरीही अचूक अहवाल प्राप्त होण्यात अडचणी येऊ शकतात. बहुतांश लहान गावांत स्वस्त मशिन्स आणि अंधुक स्क्रीन असणारे मॉनिटर असतात. इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनच्या (आयआरआयए) म्हणण्यानुसार, देशात 12 हजार प्रशिक्षित रेडिओलॉजिस्ट आहेत. 80 हजार अल्ट्रासाउंड मशिन्स आहेत.

या पार्श्वभूमीवर आयआरआयएचे अध्यक्ष डॉ. जिग्नेश ठक्कर म्हणाले, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि एमबीबीएस डॉक्टर प्रशिक्षणाशिवाय अल्ट्रासाउंड मशीन वापरत असून त्यांच्याकडून चुकीचे अहवाल दिले जात आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे याची आम्ही तक्रारही केली आहे.
एकीकडे कमकुवत स्कॅनिंग, अंधुक चित्र
- सन 2000 च्या आधीपासून वापरात असलेल्या 90 टक्के सोनोग्राफी मशिन्स सुरुवातीस चुकीचा अहवाल देतात.
- यांच्या टूडी इमेज असतात. रेडिओलॉजिस्ट बहुतांश वेळा अनुभवाच्या आधारे अहवाल देतात.
- स्कॅनिंग व्यवस्थित झाले, तरी एवढ्या जुन्या मशीनचा मॉनिटर दगा देतो. त्याचे रिझोल्युशन कमी असल्यामुळे शरीराच्या आतमधील भाग स्पष्ट दिसत नाही.
- अशा स्थितीत रेडिओलॉजिस्ट आणि डॉक्टर एकमेकांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निष्कर्षापर्यंत येतात. अहवाल देण्यात चालढकल होऊ शकते.

दुसरीकडे, थ्रीडी- फोर डी स्कॅनिंगचा एचडी निष्कर्ष
- संपूर्णपणे डिजिटल. निष्कर्ष थ्रीडी-फोर डीमध्ये येतो.
- कलर डॉप्लर असल्यामुळे ज्या भागाचे विवरण द्यायचे असेल तो भाग वेगळ्या रंगात दिसतो. अल्ट्रा-हाय रिझोल्युशन असणारे मॉनिटर स्क्रीन.
- आता स्मार्टफोन सोनोग्राफी : मोबिसेंट नाऊ या मोबाइल हेल्थ कंपनीने 2011 मध्ये स्मार्टफोन सोनोग्राफी लाँच केले. स्कॅनरशी जोडलेल्या स्मार्टफोनला सॉफ्टवेअरच्या मदतीने सोनोग्राफीत रूपांतरित केले. अमेरिका सरकारने ग्रामीण आरोग्य केंद्रात याच्या वापरास परवानगी दिली आहे.