आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonu Nigam Said Govt Must Take Action Against Those Issues Death Threats In The Form Of Fatwa

हत्‍येचा फतवा काढणाऱ्यांविरोधात सरकारने कारवाई करावी, सोनू निगमची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- हत्‍येचा फतवा काढणाऱ्यांविरोधात सरकारने कारवाई करावी, अशी मागणी सोनू निगमने आज केली आहे. 'सकाळी मस्जिदवरील लाऊडस्‍पीकरद्वारे दिल्‍या जाणाऱ्या अजानमुळे आपली झोपमोड होते', असे वक्‍तव्‍य केल्‍यामुळे सोनू याआधी वादात सापडला होता. त्‍याच्‍या या वक्‍तव्‍यामुळे कोलकात्‍यातील एका मौलवीने सोनूविरोधात फतवा जारी केला होता. 
 
माझे शिर कापणाऱ्याला 51 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर झाले होते
- 'माझा सर्वव्‍यापी ईश्‍वरावर पूर्ण विश्‍वास आहे. मात्र एखाद्याचे शिर कापा, केस कापा किंवा मारुन टाका, अशा पध्‍दतीची मानसिकता मला अजिबात पटत नाही', असे एका टीव्‍ही कार्यक्रमादरम्‍यान सोनू निगमने सांगितले.  
- 'एका फतव्‍यात माझे शिर कापणाऱ्याला 51 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर झाले होते. सरकारने असा फतवा जाहीर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली पाहीजे', अशी मागणी सोनू निगमने केली. 
- आपण लोकशाही आणि सभ्‍य म्हणवल्‍या जाणाऱ्या देशात राहतो. अशा देशात फतवा सारख्‍या गोष्‍टींना परवानगी कशी काय असू शकते? असा प्रश्‍न सोनूने यावेळी विचारला. 
 
मी गौरक्षकांद्वारा केल्‍या जाणाऱ्या हत्‍येच्‍या विरोधात 
- 'मी गौरक्षकांद्वारे निष्‍पाप लोकांचे बळी घेण्‍याच्‍या विरोधात आहे. मी कोणत्‍याही पध्‍दतीच्‍या गुंडगिरीविरोधात आहे. तुम्‍ही 12 जण मिळून एका असहाय कुटुंबाला धर्माच्‍या नावावर कसे काय धमकावू शकता? आपल्‍या देशात अशा गोष्‍टी घडायला नकोत', अशी अपेक्षा यावेळी सोनूने व्‍यक्‍त केली.      
 
मी अजानसोबतच आरती, गुरुवाणी यांचादेखील उल्‍लेख केला होता 
- यावेळी सोनू म्‍हणाला, 'माझे वक्‍तव्‍य लाऊडस्‍पीकरविरोधात होते, अजानविरोधात नाही. मी ट्विट्समध्‍ये अजानसोबतच आरती आणि गुरुवाणी यांचादेखील उल्‍लेख केला होता.' 
- 'सुप्रीम कोर्टानेही 2013मध्‍ये याबाबत आदेश दिला आहे', असे सोनूने सांगितले. 
 
आम्‍हीदेखील रात्री 10 नंतर शो करत नाही
- 'एकेकाळी आम्‍हीही रात्रभर संगीताचे कार्यक्रम करत होतो. मात्र मागील काही वर्षांपासून आम्‍ही रात्री 10 नंतर असे कार्यक्रम करणे बंद केले. आता पोलिसांची परवानगी घेऊन नागरी वस्‍तीपेक्षा दूर अशा स्‍टेडियम किंवा banquet hall मध्‍ये आम्‍ही शो करतो. तुम्‍ही याला नीट समजून घेतले तर मी एका सामाजिक विषयासंदर्भात बोललो होतो. त्‍याला विनाकारण धार्मिक वळण देण्‍यात आले', असे सोनूने यावेळी सांगितले.  
 
 
 
बातम्या आणखी आहेत...