आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soon, Telecom Companies Will Be Held Accountable For Call Drops

स्पेक्ट्रम वाटपामुळे डिजिटल इंडिया अभियानास वेग येईल - रविशंकर प्रसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी काळात घरबसल्या बिल भरणे, सरकारी सेवांचा लाभ घेणे, ऑनलाइन खरेदी, व्यवहार त्याचबरोबर एका क्लिकवर बँकिंग करणे अधिक सोपे आणि सुलभ होईल, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी "दिव्य मराठी नेटवर्क'ला दिली. वरील सेवांसोबतच स्पेक्ट्रम लिलावांमुळे कॉल ड्रॉपसारख्या सुविधांपासूनही ग्राहकांना मुक्तता मिळेल, असे प्रसाद म्हणाले.
स्पेक्ट्रम लिलावामुळे संवाद आणि समन्वात क्रांती येईल. प्रसाद यांनी याची माहिती देताना सांगितले की, "आम्ही स्पेक्ट्रम लिलावात पारदर्शकता आणताना प्रक्रियेला प्रामाणिकता व मागणीनुसार बनवले आहे. उद्योग व ग्राहकांना त्याचा लाभ होईल. मोदी सरकारचे उद्दिष्ट प्रत्येक व्यक्तीच्या हातात सरकार हे आहे.
हे तेव्हाच शक्य होईल. जेव्हा सर्वांकडे मोबाइल, इंटरनेट व ब्रॉड बँड असेल. याच कारणामुळे आम्ही पहिल्यांदाच एकाचवेळी ४७० मेगाहर्टज स्पेक्ट्रम लिलावासाठी उपलब्ध करून दिले. हे ८००, ९००, १८०० , २१०० अशा सर्व मेगाहर्टज बँडमध्ये होते. सरकारला या लिलावातून १.१० लाख हजार कोटी रुपये मिळाले असून असे प्रथमच घडले आहे.
' २०१० मध्ये या लिलावातून १.०५ लाख कोटी रुपये मिळाले होते. परंतु यापैकी केवळ ३० हजार कोटी रुपयेच बीएसएनएल - एमटीएनएलला मिळाले होते. प्रथमच खासगी कंपन्यांकडून संपूर्ण रक्कम हाती आली आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की, स्पेक्ट्रममध्ये कुठला अडथळा येऊ नये अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती. त्यामुळेच पेशाने वकील असलेल्या रविशंकर प्रसाद यांनी स्पेट्रम प्रकरणाच्या सर्व बाजूंचा सखोल अभ्यास केला व स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया, तारीख घोषित केली. प्रक्रियेअाधी सर्व पैलूंचा अभ्यास केला गेल्याने व त्यांचे पालन काटेकोरपणे केले जाईल, असा विश्वास दूरसंचार मंत्रालयाने न्यायालयाला दिला.
प्रसाद म्हणाले की, न्यायालयाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही प्रक्रिया त्यात कुठलाही अडथळा येऊ न देता पारदर्शकपणे पार पाडली. यूपीए सरकारच्या काळात टूजी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्याने सरकारची प्रचंड बदनामी झाली होती. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने या प्रक्रियेत पारदर्शकतेवर जास्त भर दिला आहे.