आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soon You Can Deposit Money In Your Account From Any Bank

कोणत्याही बँकेतून जमा करा तुमच्या खात्यात पैसे, \'एफडी\'वर लागणार नाही दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / मुंबई - तुम्ही परगावी आहात किंवा घाईत आहात आणि तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत, तर आता तुम्ही कोणत्याही (तुमचे खाते नसलेल्या) बँकेत जाऊन तुमच्या खात्यात पैसे जमा करु शकता. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अशा पद्धतीची सुविधा तयार केली आहे. यात एटीएममध्येही पैसे जमा करण्याची सुविधा असणार आहे. ही योजना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन संचलित करणार आहे.

मुदत ठेवीतून (एफडी) पैसे काढणे झाले सोपे, नाही लागणार दंड
ग्राहकांना आता मुदत ठेवीतून (एफडी) पैसे काढणे सोपे झाले आहे. 15 लाखांपर्यंतच्या एफडीमधून मुदत संपण्यापूर्वी पैसे काढता येणार आहेत आणि त्यासाठी ग्राहकांना कोणताही दंड लागणार नाही. आरबीआयने सर्व बँकाने तसे निर्देश दिले आहेत. याशिवाय आरबीआयने एक समान रकमेसाठी आणि एक समान कालावधीसाठीच्या एफडीवर वेगवेगळे व्याज देण्याची ऑफर ग्राहकांना देण्यासाठी बँकाना नियम तयार करण्यास सांगितले आहे. आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या एका अधिसूचनेनुसार 15 लाखांपर्यंतची एफडीवर निर्धारिक कालावधी आधी पैसे काढल्यास ग्राहकांना दंड आकारला जाणार नाही.

जनधन खाते धारकांसाठी 5 हजारापर्यंत ऑव्हर ड्राफ्ट
जनधन योजनेंतर्गत देशात अनेकांना बँक व्यवहारासोबत जोडण्यात आले आहे. आता ही खाती नियमीत सुरु राहावीत यासाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाणार आहे. अर्थ मंत्रालयाने बँकाना निर्देश दिले आहे, की जनधन खाते धारकांना लवकरात लवकर ओव्हरड्राफ्ट (कर्ज सुविधा) देण्याची तयारी करा. ज्या खातेधारकांनी जनधन योजनेतंर्गत खाते उघडले आहे त्यांना 5000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट दिला जाणार आहे. यामुळे खातेदारांचा बँकेसोबत व्यवहार सुरु राहाण्यास मदत होईल.
काय आहे योजना ?
देशातील सर्वांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी भारत सरकारने जनधन योजना सुरु केली. ही खाती सक्रीय ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आता खातेधारकांना पाच हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा सुरु केली आहे. यासाठी या खात्यांवर सहा महिन्यापेक्षा जास्त काळ व्यवहार झालेला असला पाहिजे. त्यासोबतच बँक अधिकाऱ्यांना तुमचा देव-घेव व्यवहार समाधानकारक वाटला पाहिजे.