आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदी प्रकरणात दुष्यंत सिंह यांना अद्याप क्लिनचीट नाही : अरुण जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललित मोदी यांच्याशी देवाण घेवाण प्रकरणी अद्याप दुष्यंत सिंह (राजस्थानच्या CM वसुंधरा राजे यांचा मुलगा आणि भाजप खासदार) यांना क्लीन चीट दिली नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले आहेत. या प्रकरणी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून संबंधित संस्था त्यांचे काम योग्य रितीने करतील असेही जेटली म्हणाले.

मोदी दुष्यंत यांच्यात व्यवहार
आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी दुष्यंत यांच्या कंपनीमध्ये 11 कोटी 63 लाख गुंतवल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी झाला होता. पण हा दोघांमधील वैयक्तीक व्यवहार असल्याचे जेटली म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे दुष्यंत यांना क्लीनचीट असल्याचे मानले जात होते. पण आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे जेटली मंगळवारी म्हणाले. मी क्लीनचीट हा शब्द वापरलाच नाही. या प्रकरणात संबंधीत संस्था त्यांचे काम करत आहेत, असे जेटली म्हणाले. वसुंधरा यांचा मुलगा दुष्यंत राजस्थानच्या झालावाडचे खासदार आहेत.

ललित मोदी पळपुटे, भाजपची टीका
भाजप खासदार आणि देशाचे माजी गृहसचिव आर.के. सिंह यांनी ललित मोदी हे पळपुटे असल्याची टीका केली आहे. मंगळवारी मिडियाबरोबर बोलताना सिंह म्हणाले की, पळपुटा कोणीही असला तरी त्याची मदत करणे चुकीचेच आहे. मग मदत कोणी केली याने फारसा फरक पडत नाही. ललित मोदींना परत आणून त्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. त्यांचा भारतीय पासपोर्टही रद्द करायला हवा. मुंबईचे पोलिस आयुक्त मोदींची भेट घेतल्याप्रकरणी अडचणीत आले असतानात सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे.
बातम्या आणखी आहेत...