आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेससाठी दक्षिण भारतही ‘यूपी-बिहार’ होणार का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एक-दोन वेळा सोडले तर दक्षिण भारत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 1977 व 1989 मध्ये संपूर्ण भारतात काँग्रेसविरोधी लाट असताना येथे फारसा फरक पडला नव्हता. काँग्रेसचे जवळपास असेच वर्चस्व उत्तर प्रदेश व बिहारमध्येही होते. स्वातंत्र्यानंतर 1967 व 1977 वगळता या दोन्ही राज्यांत काँग्रेसचीच सरकारे राहिली आहेत. 1984 मध्ये तर काँग्रेसच्या ताब्यात उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 85 पैकी 83 आणि बिहारमधील 54 पैकी 48 जागा होत्या; परंतु त्यानंतर मंदिर-मंडल वादात सापडून येथून काँग्रेस भुईसपाट झाली. एवढी की, 1998 मध्ये उत्तर प्रदेशात एकही जागा जिंकता आली नाही व बिहारमध्ये केवळ दोनच जागा मिळाल्या. दक्षिण भारतातही तिची हीच स्थिती होणार आहे की काय? हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी नेटवर्क’ने काही निवडणुकांचे विश्लेषण केले.

लोकसभेच्या 129 पैकी केवळ 35 जागांवर गुंडाळण्याची शक्यता
\\ 2009 चे निकाल

सर्वेक्षणाच्या आधारावर 2014 चे संभाव्य निकाल
आंध्र प्रदेश : 42 जागा
काँग्रेस 33
तेलुगू देसम पार्टी 06
तेलंगणा राष्ट्र समिती 02
अन्य 01
हेडलाइन्स टुडे- सी व्होटर
काँग्रेस - 07
टीडीपी - 13
टीआरएस - 12
वायएसआर काँग्रेस - 11
भाजप - 01
सीएनएन- आयबीएन- द हिंदू- सीएसडीएस
काँग्रेस - 11-15
वायएसआर काँग्रेस - 11-15
टीडीपी - 6-10
टीआरएस - 5-9
इंडिया बिहाइंड द लेन्स (आयबीटीएल)
काँग्रेस - 13
भाजप - 3
टीडीपी - 13
टीआरएस - 5
वायएसआर - 6

2014 चे चित्र : आंध्रमध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त 15 आणि कमीत कमी 7 जागा मिळू शकतात. मागच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा (33) याच राज्यात मिळाल्या होत्या.

कारण : वायएसआर रेड्डींसारख्या प्रभावशाली नेत्याचे आकस्मिक निधन आणि तेलंगणा वादानंतर पक्षात फाटाफूट.
@जगनमोहन रेड्डी यांच्या नवीन पक्षामुळे काँग्रेसचेच नुकसान.
@आयबीटीएलचे सर्वेक्षण सर्वांत रंजक आहे. त्यानुसार मोदींच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली, तर काँग्रेसला 13 जागा मिळतील आणि मोदींचे नेतृत्व नसेल, तर काँग्रेसला केवळ 5 जागा मिळतील. अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण हे त्याचे कारण सांगण्यात आले आहे.

तामिळनाडू 39 जागा
डीएमके 18
एआयएडीएमके 09
काँग्रेस 08
अन्य 03
हेडलाइन्स टुडे- सी व्होटर
काँग्रेस - 01
एआयडीएमके - 30
डीएमके - 4

सीएनएन- आयबीएन- द हिंदू- सीएसडीएस
काँग्रेस - 1-5
एआयडीएमके - 16-20
डीएमके - 8-12
इंडिया बिहाइंड द लेन्स (आयबीटीएल)
काँग्रेस - 01
एआयडीएमके - 25
डीएमके - 7

2014 चे चित्र : तामिळनाडूमध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त 5 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

कारण : यूपीएमध्ये काँग्रेसचा सहकारी असलेल्या डीएमकेबाबत लोकांचा रोष. त्याचा परिणाम काँग्रेसवर पडणार आहे.