सिंगापूरमध्ये राहणारी 19 वर्षांची भारतीय ट्रिसिया फर्डिनांडने नुकतेच #SouthIndianAndProud हॅशटॅगची सुरुवात केली आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून पूर्ण जग दक्षिण भारतीय (साऊथ इंडियन)
आपल्या रंगाचा अभिमान बाळगत आपले छायाचित्रे ट्विट्वर पोस्ट करत आहेत. मुलींबरोबर अनेक मुलेही हॅशटॅगसोबत आपले फोटोज ट्विट करीत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये हे
ट्विटरवर ट्रेण्डींगमध्ये आले होते.
- ट्रिसिया म्हणते, की जेव्हाही भारतीयांविषयी बोलले जाते तेव्हा लोकांच्या मनात उत्तर भारतीय डोळ्यासमोर येतात.
- दक्षिण आशियात गोरी त्वचा व युरोपियन फीचर्स असणा-यांना सुंदर मानले जाते. ही टिप्पणी माझ्यासारख्या दक्षिण भारतीयला फार अस्वस्थ करते.
- यामुळे मला वाटते, की या हॅशटॅगच्या माध्यमातून सर्व दक्षिण भारतीय आपला रंग, राज्य विसरुन स्वत:वर गर्व करावे.
- यानंतर #SouthIndianAndProud हॅशटॅगच्या माध्यमातून पूर्ण जगभरातून अनेक दक्षिण भारतीयांनी आपले फोटोज ट्विट करत आहेत.
ही कल्पना सुचली कशी
- ट्रिसिया म्हणते, ट्विटरवर #brownszn (ब्राऊन सीझन) हॅशटेग ट्रेंडींगमध्ये होता. याचा फोकस उत्तर भारतीयांच्या सौंदर्याची प्रशंसा केली होती.
- मला तेव्हा जाणीव झाली, की एक हॅशटॅग किती बदल घडवू शकतो. याला प्रत्युत्तर म्हणून मी संबंधित हॅशटॅगची सुरुवात केली.
- यानंतर अनेक लोक या मोहिमेत माझ्याशी जोडले गेले आणि दक्षिण भारतीय सौंदर्याचे कौतुक केले.
- इतकेच नव्हेतर तिने याच हॅशटॅगच्या नावाने एक ट्विटर हँडलही बनवले आहे. यात एक हजारापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
कोण आहे ट्रिसिया फर्डिनंड
- ट्रिसिया सांगते, माझे वडील केरळचे होते व आई तमिळ आहे.
- कोणत्याही भारतीय चित्रपटाचे नाव समोर आले, की एक काळ्या त्वचेच्या हिरोची व गोरी अभिनेत्रीची चर्चा होत असते. याचा तिला प्रचंड राग येतो.
- या हॅशटॅगमुळे अनेक लोकांनी दक्षिण भारतीय संस्कृतीची प्रशंसा करायला एक मंच मिळाले, याचा ट्रिसियाला आनंद होतो.
पुढील स्लाइड्सवर कशा पध्दतीने दक्षिण भारतीय हॅशटॅगचा वापर करत आहेत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)