आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गाशक्ती प्रकरणाचा केंद्राने अहवाल मागताच सपाकडून विरोधाचे अस्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या महिला आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबनप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्रानंतर केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडे अहवाल मागितला. परंतु सपाने आक्रमक भूमिका घेतल्याने केंद्र अडचणीत आले आहे. अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध करू, असे सपा नेते नरेश अग्रवाल यांनी म्हटले आहे.


दुर्गा शक्तीप्रकरणी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने अखिलेश सरकारला पत्र पाठवले आहे. विभागाचा कार्यभार पंतप्रधानांकडेच आहे. हा विभाग आयएएस केडरशी संबंधित प्रशासकीय प्रकरणे हाताळतो. अधिका-याच्या निलंबनाबाबत राज्याने केंद्र सरकारला अहवाल पाठवणे ही नियमित प्रक्रियेची बाब आहे. राज्याकडून अहवालाची प्रतीक्षा असल्याचे केंद्रीय मंत्री व्ही. नारायण सामी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे प्रकरणाचा गुंता वाढला आहे.