(फोटोः समाजवादी पक्षप्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या घरी लंचसाठी पोहोचले देवगौडा, लालूप्रसाद यादव, नीतीश कुमार आणि शरद यादव)
नवी दिल्ली- समाजवादी पक्षप्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या सरकारी निवासस्थानी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी आज (गुरुवारी) रणनीती आखली आहे. यासाठी मुलायम यांनी थर्ड फ्रंटच्या नेत्यांसाठी लंचचे आयोजन केले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार, राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव, माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेता एचडी देवगौडा, जदयू अध्यक्ष शरद यादव यांच्यासह थर्ड फ्रंटचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमाला वामदलच्या नेत्यांनी दांडी मारली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारविरोधत एक 'महामोर्चा' उघडण्यात आला आहे. यासाठी कॉंग्रेस आणि भाजप वगळता सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्याची रणनीती देखील आखली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारला धारेवर धरण्यासाठी थर्ड फ्रंटचे नेते मुलायम सिंह यांच्या निवासस्थानी एकत्र आले आहेत.
कॉंग्रेस तसेच भाजपच्या अल्पमतातील सरकारला बळ देण्यासाठी या छोट्या पक्षाने कोणे एकेकाळी महत्त्वपूर्ण योगदानही दिले होते. मात्र, आता भाजप सरकारच्या विरोधात सर्व नेते एकत्र आले आहेत.
मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्याने सर्व पक्षाच्या वाट्याला निराशाच आली आहे. उत्तर प्रदेशात मुलायमसह यांच्या समाजवादी पक्षाची मोठा फटका बसला आहे. समाजवादी पक्षाला फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला. जेडीयूला तर बिहारमध्ये फक्त दोनच जागांवर समाधान मानावे लागले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, मुलायम सिंह यांच्या निवासस्थानी लंचला उपस्थित झालेल्या नेत्यांचे फोटो..