आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली: मध्यवस्तीतील 24 एकर जागा राजघराण्याच्या वंशजांकडे सुपूर्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- म्हैसूर राज्याची पहिली राजकुमारी जया लक्ष्ममणी अवारूच्या वारसांना सर्वाेच्च न्यायालयाने दिलासा दिला. बंगळुरू शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या २४ एकरांहून अधिक जागा राजकुमारीच्या वारसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. बुलियो इस्टेट नावाने प्रसिद्ध  या जमिनीचे मूल्य अब्जावधी रुपयांचे आहे. कर्नाटक सरकारने २००४ मध्ये या जागेचा ताबा घेतला होता. 

न्या. एम. बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाने सरकारच्या हेतूवर शंका घेत  १०४ वर्षे हे सरकार गप्प का बसले? अशी विचारणा केली. या जागेची विक्री झाल्यानंतर यात घोटाळा झाल्याची तक्रार करणे बेकायदेशीर आहे. २५ ऑगस्ट १९०० मध्ये म्हैसूरच्या दिवाणांनी लान्सकोट रिकेटकडून २४ एकर १२ गुंठे जमीन राजकुमारी लक्ष्ममणी यांच्यासाठी खरेदी केली होती. ही त्यांची खासगी मालमत्ता होती. जमिनीचा काही भाग सरकारने १९५७ मध्ये का अधिग्रहित केला यावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बातम्या आणखी आहेत...