आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी, सायबर गुन्हे रोखण्यासाठी खास केंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बोकाळलेल्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध सरकारने एक विशेष केंद्र स्थापण्याची घोषणा केली आहे. चाइल्ड पोर्नाग्राफी व ऑनलाइन छळावर नियंत्रण करणे हा त्याचा प्रमुख उद्देश असेल. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दिशने आराखडा तयार करण्यासाठी स्थापलेल्या तज्ज्ञ समितीने गृह मंत्रालयाला अहवाल सोपवल्यानंतर हे पाऊल टाकले जात आहे. गेल्या तीन-चार वर्षांत देशात सायबर गुन्हे ४० टक्क्यांच्या वेगाने वाढले आहेत. समितीच्या शिफारशीनुसार, बालक व महिलांवर होणाऱ्या ऑनलाइन शोषणाचे प्रमाण घटवण्याची गरज आहे. मजकूर व वेबसाइट्सवर देखरेखीची गरज आहे. कायदे कठोर करावे लागतील.

सायबर विश्वात पाल्यांच्या चांगल्या वर्तवणुकीबद्दल त्यांच्या पालकांना शिक्षित करण्याची गरज आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आधीच समितीच्या शिफारशींवर वेगाने कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. सरकारने पोर्नेग्राफीची समस्या गांर्भीयाने घेतली आहे. इंटरनेट सेवा पुरवठादारांना चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित ८०० वर वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
४०० कोटींचा खर्च
समितीच्या शिफारशींनुसार, चाइल्ड पोर्नोग्राफी व ऑनलाइन छळासह सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना लगाम लावण्यासाठी ४०० कोटी रुपये खर्चून ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ (आयसी-४) या केंद्राची स्थापना होणार आहे.