आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून अशी दिसते स्‍पेनची वेगवान रेल्‍वे, भारताच्‍या रूळावर धावण्‍याची शक्‍यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - स्‍पेनची टॅल्गो ही वेगवान ट्रेन आता भारताच्‍या रेल्वे रूळावर धावू शकणार आहे. दिल्‍ली आणि मुंबईच्‍या रूळावर हा रेल्‍वेची चाचणी घेण्‍यात येईल. त्‍यानंतर समोर आलेल्‍या अहवालात सर्व बाबी ठिक असल्‍यास या रेल्‍वेच्‍या खरेदीसंदर्भात विचार केला जाणार आहे. ट्रेनमध्‍ये काय आहे विशेष..
ट्रेनमध्‍ये काय आहे विशेष..
- या ट्रेनमध्‍ये प्रत्‍येक प्रवाशासाठी ऑडियो सिस्टम आहे. प्रत्‍येक सिटजवळ Video पाहण्‍याची सोय आहे.
- प्रवाशांना वाचन करता यावे यासाठी प्रत्‍येक सिटजवळ वैयक्तिक लाइट आहे.
- प्रत्‍येक सिटखाली प्रवाशांच्‍या पायांना आराम मिळावा यासाठी फूटरेस्ट आहे.
या ट्रेनमुळे काय होईल फायदा ?
- स्‍पेनची वेगवान रेल्‍वे दिल्ली-मुंबईच्‍या रूळावर धावली तर, दोन शहरातील अंतर 12 तासांमध्‍ये कापता येईल.
- सोबतच जास्‍त उर्जा खर्च होणार नाही, विजेची बचत होईल.
तासी वेग 160-220 km..
- स्पेनची कंपनी ताल्गो ही वेगवान रेल्‍वे तयार करते. या रेल्‍वेचा वेग तासी 160-220 km आहे.
- विशेष म्‍हणजे या रेल्‍वेसाठी नवीन रूळ तयार करण्‍याची गरज नाही.
- त्‍यामुळे दिल्‍ली, मुंबईतील रेल्‍वे रूळावर या ट्रेनची चाचणी होणार आहे.
- चाचणीनंतर सकारात्‍मक अहवाल आल्‍यास ही रेल्‍वे भारतात धावू शकेल.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, आतून कशी दिसते ही स्‍पेनची वेगवान ट्रेन..