आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Noida: Special Cell Cop Kills Self, Wife Attempts

दिल्लीच्‍या ACP ने स्‍वत:वर झाडली गोळी, पत्नीने मारली चौथ्‍या माळ्यावरून उडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमितकुमार सिंह - Divya Marathi
अमितकुमार सिंह
नवी दिल्ली - दिल्ली पोलिस दलातील अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त (एसीपी) अमितकुमार सिंह यांनी सोमवारी रात्री 11 वाजताच्‍या सुमारास आपल्‍या प्‍लॅटमध्‍ये स्‍वत:वर गोळी झाडून आत्‍महत्‍या केली. दरम्‍यान, त्‍यांच्‍या पत्‍नीने चौथ्‍या माळ्यावरून उडी घेत आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. यात त्‍या गंभीर जखमी झाल्‍या असून, त्‍यांच्‍यावर एका खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेचे नेमके कारण कळू शकले नाही. अमितकुमार हे मूळ बिहारचे रहिवासी आहेत.
पत्नीनेही केला होता स्‍वत:ला गोळी मारण्‍याचा प्रयत्‍न
2010 च्‍या बॅचचे दिल्ली अंदमान निकोबार आयलँड सिव्‍हिल सर्व्हिसेज (दानिक्स) चे अधिकारी असलेल्‍या अमित सिंह हे साउथ वेस्ट दिल्लीत स्पेशल सेलमध्‍ये कार्यरत होते. नोएडा येथील सेक्टर 100 परिसरातील लोटस ब्लू वर्ल्ड अपार्टमेंटच्‍या चौथ्‍या माळ्यावर पत्‍नीसोबत ते राहत होते. सोमवारी रात्री 11 वाजताच्‍या सुमारास त्‍यांनी आपल्‍या सर्व्‍ह‍िस रिवाल्वरमधून स्‍वत:वर गोळी झाडली. दरम्‍यान, हा प्रकार पाहून त्‍यांच्‍या पत्‍नीनेही यात बंदुकीने आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍यांना गोळी चालवता आली नाही. त्‍यामुळे त्‍यांनी चौथ्‍या माळ्यावरून उडी मारली.