आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMERICA दौरा : 9 वर्षांपूर्वीच्या त्या \'स्पेशल\' खुर्चीवर विराजमान होणार नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : 2005 मध्ये मोदींना व्हिसा नाकारल्यानंतर मोदींना अमेरिकेत जाता आले नव्हते. त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमात एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.

नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-याच त्यांचा स्वागत समारंभ मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्येच का आयोजित करण्यात आला, यामागे एक खास कारण आहे. या सोहळ्याच्या आयोजकांमध्ये समावेश असणा-या असोसीएशन ऑफ इंडियन ऑफ नॉर्थ अमेरिकाचे प्रमुख सुनील नायक यांनी याबाबत माहिती दिली.
20 मार्च, 2005 रोजी मोदींचा याच ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण मोदींना व्हिसा नाकारल्याने त्यांचा दौरा रद्द करावा लागला होता. अखेर मोदींच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून व्यासपीठावर मधोमध मोदींसाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. आता त्याच खुर्चीवर नऊ वर्ष, सहा महीने आणि आठ दिवसांनंतर म्हणजे 28 सप्टेंबर 2014 रोजी मोदी विराजमान होणार आहेत.

नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या या कार्यक्रमासाठी 50 ते 70 हजार आसनक्षमता असणा-या जागेचा शोध सुरू होता. पण तसे स्थळ उपलब्ध होऊ शकले नव्हते. अखेर, मेडिसन सक्वेअर गार्डनची निवड करण्यात आली. त्यामुळे ज्याठिकाणी 2005 मध्ये मोदींना जाता आले नव्हते, त्याठिकाणी मोदी आता पंतप्रधान म्हणून जाणार आहेत. हाही एक योगायोग आहे. पण, हा कार्यक्रम मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्येच व्हावा असा, भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह होता, अशी चर्चाही सुरू आहे.
अमेरिकेतही पुजेसाठी वेळ काढणार मोदी
नवरात्रादरम्यान देशात असताना मोदी नऊ दिवस दुर्गा सप्तशतीच्या सर्व 13 अध्यायांचे नियमित पठन करायचे. अमेरिकेतही ते यामध्ये बदल करणार नाहीत. मोदींच्या पुजेसाठी रोज 1 तास 25 मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी सप्तशती पठन सुरू ठेवणार आहेत हे नक्की. मोदींसाठी खास फलाहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधींबरोबच्या डिनर, लंच किंवा नाश्त्यावेळीही मोदींसाठी फलाहाराची सोय असेल. उपवासादरम्यान पावित्र्य कायम राहावे, यासाठी खास काळजी घेतली जात आहे.