आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकाकारांनो, हे लूट करणारे सरकार नाही हे ध्यानी घ्या : अमित शहा (विशेष मुलाखत)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकारने मंगळवारी एक वर्ष पूर्ण केले. या एक वर्षाच्या कामकाजाचा आढावा सरकारचे मंत्री सध्या विविध माध्यमातून जनतेसमोर मांडत आहेत. पण नरेंद्र मोदी यांचा उजवा हात समजले जाणारे आणि सध्या भाजप नेतृत्वाची धुरा सांभाळणारे भाजपाध्यक्ष अमित शहा हे या एका वर्षाकडे कशाप्रकारे पाहतात, हे जाणून घेण्यासाठी भास्कर समुहाच्या वतीने त्यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी सरकारवर सुटाबुटातील सरकार अशी टिका करणाऱ्यांनी हे लूट करणारे सरकार नाही, हे लक्षात घ्यावे अशा शब्दांत शहा यांनी आपले मत मांडले. जाणून घ्या या मुलाखतीतील त्यांनी इतर मते...
- भास्कर : पेट्रोल किमतींना मोदींनी नशीब संबोधलेे. आता ते महागलेे. मग हे कमनशीब आहे काय?
अम‍ित शहा : मोदी सरकारने सत्ता हाती घेतली होती तेव्हा देश डबघाईला होता. नोकरशाहीचा सरकारवरील विश्वास उडालेला होता. देशाची प्रतिमा धूसर झाली हाेती. अशा परिस्थितीत आमच्या सरकारने जे काही केले ते माेठेच यश आहे. पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून आहेत, त्यात आपली मर्जी नाही.

- भास्कर : "सुटाबुटातील सरकार' हे या वर्षीचे सर्वात प्रचलित वाक्य आहे. भाजपकडे त्याचे उत्तर आहे का?
अम‍ित शहा : हे लूटवाले सरकार तर नाही ना? मागील सरकारने ७० पेक्षा जास्त घोटाळे केले. १२ लाख कोटी रुपयांचा घोळ केला.

- भास्कर : घोटाळ्यांवरून काँग्रेसवर दुगाण्या झाडण्याचा काळ संपला आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
अम‍ित शहा : अटलजींनी देशाची धुरा हाती घेतली तेव्हा विकासदर ४.४ टक्के होता. सहा वर्षांनंतर तो ८.४ टक्क्यांवर गेला. यूपीएला तो वारसा म्हणून मिळाला. मात्र, १० वर्षांत त्यांनी तो पुन्हा ४.४ टक्क्यांवर आणून ठेवला.

- भास्कर : मंत्र्यांच्या हेरगिरीच्या बातम्या वारंवार येतात....?
अम‍ित शहा : ही बाब अत्यंत निराधार व भ्रामक आहे. आपल्या मंत्र्यांवर विश्वास न ठेवण्याच प्रश्नच उद्भवत नाही.
महाराष्ट्राचे काहीही हिसकावत नाहीत

- भास्कर : महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सरकार स्थापूनही दोघांत ताळमेळ नाही. दोन्ही एकमेकांना शंकेच्या नजरेने पाहतात. सरकारवर त्याचा परिणाम दिसून येतो. ही युती किती दिवस टिकेल?
अम‍ित शहा : निवडणुकीत आम्ही समोरासमोर होतो. यामुळे कटुता स्वाभाविक आहे. मात्र, आम्ही जुने मित्र आहाेत. दोघांत सामंजस्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. जेणेकरून महाराष्ट्रात एक स्थिर आणि सुशासनाचे सरकार कायम राहावे.

- भास्कर : ज्याप्रमाणे गुजरातेत फायनान्स सेझ, गिफ्ट सिटी विकसित होत आहे. त्यामुळे मुंबईला देशाची आर्थिक राजधानी पाहणाऱ्या मराठी लाेकांत एक असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
अम‍ित शहा : हा अत्यंत खोटा व निरर्थक आरोप आहे. महाराष्ट्राकडून काहीही हिसकावले जात नाहीये. अहमदाबादेत सेझ, गिफ्ट सिटी विकसित झाल्याने मुंबईवर कोणताही परिणाम होणार नाही.

- भास्कर : देवेंद्र फडणवीस यांचा मोदींवर अत्यंत विश्वास आहे. मात्र, पक्षातील इतर गट त्यांना सहकार्य करत नाही.
अम‍ित शहा : महाराष्ट्रात फडणवीस सरकार पूर्ण एकजुटीने काम करत आहे. गेल्या सहा महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर कमी झाले. रस्ते दुरुस्ती, १५ टोल नाके हटवण्यात आले. शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीबाबत जागरुक करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित झाले.

पुढील स्लाइडवर वाचा, हरियाणा, पंजाब आणि ब‍िहारमध्ये काय असेल भाजपची रणनीती...