आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Investigation Group Investigate Coal Scam BJP

विशेष तपास पथकाने कोळसा वाटप घोटाळ्याची चौकशी करावी - भाजप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विशेष तपास पथकाने ( एसआयटी) कोळसा खाण वाटपात झालेली अनियमितेची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने शनिवारी (ता. 13 ) केली. सत्ताधारी युपीए सरकार केंद्रीय अन्वेषण विभागाला ( सीबीआय) आपले काम स्‍वतंत्रपणे करू देत नसल्याचे आरोप भाजपने केला आहे.


एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार, सीबीआयने मागील महिन्यात कोळसा वाटप घोटाळ्याचा अहवाल सरकारला सादर केला. कायदा मंत्री अश्विन कुमार आणि पंतप्रधान कार्यालयाने त्या अहवालाची योग्य -अयोग्यता तपासली होती. अहवाल सादर करण्‍यापूर्वी सीबीआयचे संचालक रंजीत सिन्हा यांना कायदा मंत्र्यांनी बैठकीसाठी बोलव‍ले होते. त्या दरम्यान अनेक सुधारणांचा नव्याने त्या अहवालात समावेश करण्‍यात आल्याचे वर्तमानपत्राच्या बातमीत म्हटले आहे.


भाजपाचे नेते अरूण जेटली संबंधीत वर्तमानपत्राचा हवाला देत म्हणाले, एसआयटीने प्रशासनाकडे दुर्लक्ष करून कोळसा घोटाळ्याची चौकशी कारावी. सीबीआयने आपली स्वायत्त अशी प्रतिमा जपली पाहिजे. परंतु असे करू न देता युपीए सरकार त्याला आडकाठी आणत आहे. भाजप नेत्या सुषमा स्वराज बातमी संबंधीत ट्विटमध्‍ये म्हटले , सीबीआयच्या अहवालात झालेले बद्दल खूप गंभीर आहेत.