आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Paramilitary Unit Takes Over Par Security

अधिवेशनासाठी संसदेवर पीडीजीची करडी नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसद सुरक्षेसाठी असलेले विशेष कमांडोंचे पथक सज्ज झाले आहे. संसद संकुल परिसरात सुरक्षेची पूर्वतयारी झाली आहे.

पार्लमेंट ड्यूटी ग्रुपच्या (पीडीजी) जवानांचे दल देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल म्हणून ओळखले जाते. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पीडीजीची स्थापना करण्यात आली. पीडीजीने आता संसदेच्या परिसराचा पूर्ण ताबा घेतला आहे. पीडीजीची संसद आणि परिसरावर चोवीस तास करडी नजर असेल, अशी माहिती सुरक्षा विभागातील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असून ते सोमवारपासून म्हणजे 7 जुलैपासून त्याची सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात मुख्य संसद सभागृह, स्वागत कक्ष इमारत, संसदीय ज्ञानपीठ (संसदेची ग्रंथालय इमारत), संसदेची जोड इमारत यावर सुरक्षा पथकाची करडी नजर आहे. त्यात व्हीव्हीआयपी, खासदार आणि इतर पाहुण्यांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान पीडीजीसमोर आहे.

अधिवेशन काळातील तसेच इतर कालावधीतील सुरक्ष यंत्रणेची फेररचना करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. आता सुरक्षेची जबाबादारी याच यंत्रणेकडे राहण्याची शक्यता आहे.

2001 च्या घटनेनंतर स्थापना
13 डिसेंबर 2001 मध्ये 5 शस्त्रधारी हल्लेखोरांनी संसदेच्या परिसरात केलेल्या तुफान गोळीबारात दिल्ली पोलिसांचे पाच जवान शहीद झाले होते. त्यात सीआरपीएफच्या एका महिला सैनिकाचा समावेश होता. त्याचबरोबर मृतांमध्ये संसदेच्या दोन कर्मचार्‍यांचाही समावेश होता. त्या वेळी झालेल्या चकमकीत पाचही दहशतवादी ठार झाले होते. त्या घटनेनंतर पीडीजीची स्थापना करण्यात आली. पीडीजीमध्ये काही सीआरपीएफचेदेखील जवान आहेत. हे स्वतंत्र सुरक्षा दल आहे