आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांचे कन्यादान केले होते अमिताभ बच्चन यांच्या आईने; वाचा, लग्नाआधी कुठे होता मुक्काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोनिया आणि राजीव गांधी यांची भेट झाली ते वर्ष होते 1965. तीन वर्षांच्या डेटिंगनंतर सोनिया आणि राजीव यांचे लग्न झाले. 1968 च्या जानेवारीच्या थंडीत सोनिया प्रथमच भारतात आल्या. दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांना घेण्यासाठी राजीव गांधींचे अतिशय जवळचे मित्र, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन गेले होते. 25 फेब्रुवारी रोजी सोनिया आणि राजीव यांचे लग्न झाले, तोपर्यंत त्या बच्चन कुटुंबियाच्या घरी राहिल्या होत्या.
सोनिया गांधी यांचा जन्मदिन
सोनिया गांधी यांचा शुक्रवारी (9 डिसेंबर) 70 वा वाढदिवस झाला. यानिमित्ताने divyamarathi.com सांगत आहे त्यांच्या आणि तेजी बच्चन यांच्या नात्याबद्दल..
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जन्म इटलीतला, पण आता त्या पूर्णपणे भारतीय झाल्या आहेत. राजीव-सोनियांचे लग्न झाले तेव्हा सोनियांच्या कुटुंबातील कोणीच लग्नाला उपस्थित नव्हते. सोनियांचे कन्यादान गांधी घराण्याचे कौटुंबिक मित्र हरिवंशराय बच्चन यांनी केले होते.
तेजी बच्चन यांनी मुलीसारखे सांभाळले होते सोनियांना
राजीव आणि सोनिया यांच्या तीन वर्षांच्या डेटिंगनंतर 1968 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते. भारतात आल्यानंतर लग्नापर्यंत त्या बच्चन कुटुंबासोबत राहिल्या. अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन आणि राजीव गांधींच्या आई इंदिरा गांधी या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. देशाच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मुलाच्या प्रेमसंबंधाची माहिती नव्हती. सोनिया आणि राजीव यांच्या संबंधाची माहिती इंदिरांना करुन देण्याची जबाबदारी तेजी बच्चन यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासाठी जवळपास दोन महिने गेले. तोपर्यंत सोनिया बच्चन कुटुंबासोबत राहात होत्या. अखेर इंदिरांनी विवाहाला मान्यता दिली आणि 25 फेब्रुवारी रोजी अमिताभ बच्चन यांच्या घरी राजीव-सोनिया विवाहबंधनात अडकले.
अमिताभ यांच्या आई-वडिलांनी केले कन्यादान
लग्नाच्या वेळी सोनिया गांधींचे कुटुंब इटलीत होते. त्यामुळे अमिताभ यांचे वडील हरिवंशराय आणि आई तेजी यांनी सोनियांचे कन्यादान केले.
लंडनमध्ये झाली होती पहिली भेट
भारतातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यातील मुलगा राजीव गांधी आणि सोनिया मायनो यांची पहिली भेट लंडनमध्ये 1965 मध्ये झाली. सोनिया 1964 मध्ये ब्रिटनच्या कॅम्ब्रिज शहरात इंग्रजी शिक्षणासाठी आल्या होत्या, तर राजीव कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ ट्रिनिटीमध्ये शिक्षण घेत होते. राजीव आणि सोनिया यांची पहिली भेट एका रेस्तराँमध्ये झाली होती. सोनिया येथे पार्ट-टाइम जॉब करत होत्या. याच रेस्तराँमध्ये राजीव यांनी सोनियांना प्रथम पाहिले आणि पाहाताक्षणीच ते प्रेमात पडले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोनिया-राजीव गांधी यांचे लग्नापासून प्रचारापर्यंतचे निवडक फोटोज्...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...