आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेक्ट्रम परवाने रद्द व्हायला हवे होते, चिदंबरम यांना पश्चात्ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - २-जी प्रकरणाला वेगळ्या पद्धतीने हाताळता आले असते, असे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मान्य केले आहे. स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याचा मुद्दा चव्हाट्यावर आल्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करायला नको होती. स्वत: हून सर्व परवाने रद्द करायला हवे होते, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी एका कार्यक्रमात चिदंबरम यांनी ही भूमिका मांडली. चिदंबरम म्हणाले, २ जी आणि इतर प्रकरणात कॅग अहवालातून काँग्रेसला फटला बसला आहे. आम्ही वेगळ्या पद्धतीने काम करायला हवे होते. त्यानंतर पंतप्रधानांना आपण पुढे असल्याचे अधिक आत्मविश्वासाने सांगता आले असते. याच धोरणाने त्यांना वाटचाल करता आली असती. परंतु दुर्दैवाने असे होऊ शकले नाही. आमच्या हातून काही चुका झाल्या. दुसरीकडे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करण्याची ग्वाही दिली.