आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता केवळ पोस्ट ऑफिसमधून नव्हे तर ATM मधूनही करता येईल स्पीड पोस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पैसे काढण्यासह पार्सल किंवा स्पीड पोस्ट पाठविण्यासाठी आता तुम्ही एटीएमचा वापर करु शकाल. यासाठी डाक विभागाने स्टेट बॅंक ऑफ इंडियासोबत करार केला आहे. आंध्र प्रदेशातील लोकांना सर्वांत प्रथम ही सुविधा मिळेल. त्यानंतर मिळणारा प्रतिसाद बघून देशभरात ही सुविधा राबविली जाईल.
एसबीआयने आंध्रात लावले 95 विशेष ATM
आंध्र प्रदेशात हा प्रकल्प सर्वांत आधी राबविला जाणार आहे. यासाठी राज्यभरात 95 विशेष एटीएम बसविण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून पैसे काढण्यासह पार्सल आणि स्पीड पोस्ट पाठविता येणार आहे. त्याचा फायदा तेथील सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे. त्यामुळे लोकांना पार्सल किंवा स्पीड पोस्टसाठी पोस्टाच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
असे पाठविले जाईल ATM मधून स्पीड पोस्ट
स्पीड पोस्ट पाठविण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला केवळ दोन मिनिटांचा वेळ लागेल. यासंदर्भात आंध्र प्रदेश सर्कलचे चीफ पोस्ट मास्टर जनरल बी. वी. सुधाकर यांनी सांगितले, की एटीएममध्ये गेल्यावर ग्राहकांना स्पीड पोस्ट बुकिंगचे ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर एटीएमला शेजारी लागलेल्या वेटिंग मशिनवर पार्सल ठेवावे लागेल. त्यानंतर वजनानुसार शुल्क आकारले जाईल. एटीएमच्या स्क्रीनवर ग्राहकांना हे शुल्क दिसेल.
त्यानंतर ओके केल्यावर एटीएममधून एक कागद बाहेर येईल. तो तुमच्या पार्सलवर लावावा लागेल. त्यानंतर पार्सल एटीएमच्या शेजारी असलेल्या बॉक्समध्ये टाकावे लागेल. एटीएमच्या स्क्रीनवर दिसलेले शुल्क तुमच्या खात्यातून वजा केले जाईल.