आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spend 6 Pereent Fund On Education, Primary Teachers Get High Salary

शिक्षणावर ६ टक्के निधी खर्च करा, प्राथमिक शिक्षकांना मिळावे सर्वाधिक वेतन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सकल घरेलू उत्पादनाच्या एकूण सहा टक्के खर्च भारतीय शिक्षणावर खर्च व्हावा, तर प्राथमिक शिक्षकांना सर्वाधिक वेतन मिळावे. मात्र या स्थितीत शिक्षकांचे प्रशिक्षणही काटेकोर असावे म्हणून भारतीय शिक्षण मंडळ देशभरातील लाेकांची मते जाणून घेत असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारचे शैक्षणिक धाेरण कसे असावे यासंदर्भात अहवाल सादर केला जाणार अाहे.
भारतीय शिक्षण मंडळाचे नागपूरचे संघटन मंत्री मुकुल कानिटकर यांनी बुधवारी माध्यमांना माहिती देताना उत्तम शिक्षण कसे असावे यासाठी देशभरातील लाेकांचे मत जाणून घेतले जाणार असल्याची माहिती दिली. संघटनेतर्फे नाेव्हेंबरपर्यंत सर्वच राज्यातून प्रतिक्रिया घेतल्या जाणार अाहेत.
देशात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच दिले जावे, भारतातील सर्वच भाषांमध्ये उच्च शिक्षणाची साेय सरकारने उपलब्ध करून द्यावी, पहिल्या आणि दुस-या वर्गात विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ नये तर तिसरी व चौथी वर्गात केवळ ताेंडी परीक्षा व्हावी, पाच ते सात पर्यंत लेखी परीक्षा घ्यावी, अाठव्या वर्गात ४० टक्के गुण ठेवण्यात यावेत,अशा काही सूचना संघटनेने केलेल्या आहेत.

याशिवाय नववीपासून अभ्यासक्रमाला सहा भागांमध्ये विभाजित करावे, दहावी ते बारावी अंतर्गत अािण बाह्य परीक्षांची विभागवारी ४०:६० अशी असावी, अाठव्या वर्गानंतर अायटीअाय आणि त्यानंतर तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश देण्यात यावा, बारावी नंतर दाेन वर्ष शिक्षण घेतल्यास त्याला विद्यापीठाची पदवी देण्यात यावी, अशा अनेक सूचनांचा यात समावेश आहे.