आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Spend Billions On Amitabh, But No Money To Repay Outstanding Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ बच्चनवर कोट्यवधी खर्च, मात्र थकबाकी भरायला पैसे नाहीत : सुप्रीम कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर थकबाकी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बिनानी सीमेंट कंपनीला चांगलेच फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने कंपनीला म्हटले की, 'तुमच्याकडे अमिताभ बच्चनला जाहिरातीपोटी देण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत. पण राजस्थान सरकारचा थकलेला कर चुकवण्यासाठी मात्र तुमच्याकडे पैसे नाहीत?'
कंपनीकडे असलेला 154 कोटी रुपयांचा कर थकलेला आहे. हा कर वसूल करण्याच्या राजस्थान सरकारच्या पद्धतीच्या विरोधात कंपनीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने कंपनीला सुनावले आहेत. तसेच राजस्थान सरकार करत असलेली कारवाई कोर्टाने योग्य ठरवली आहे. तसेच ही कारवाई थांबवण्यासही सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. अशा परिस्थीतीत राज्य सरकार कारवाई करणार नाही, तर काय करेल. कर नसेल तर सरकार कसे चालेल, असा सवाल कोर्टाने केला आहे.
काय होते प्रकरण
बिनानी सीमेंटने राजस्थान सरकारला 154 कोटी रुपयांचा थकलेला करत वसूल करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. पण राज्य सरकारने त्याला नकार दिल्याने कंपनीने राजस्थान हाईकोर्टात धाव घेतली. पण त्याठिकाणीही अपयश हाती आल्याने कंपनी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली होती.