आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SpiceJet Charged With \'cruelty\', To Pay Rs. 1 Lakh Penalty

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमान प्रवाशाला १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे स्पाईसजेटला आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गोव्यावरून दिल्लीला विमानाने येताना कन्फर्म तिकीट असतानाही कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच विमानाने येऊ न दिल्याने ग्राहक मंचाने स्पाईसजेट या कंपनीला तब्बल १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

ही व्यवसायाची योग्य पद्धती नसून तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात लहान मुले आणि महिला असतानाही त्यांना दोन विभागांमध्ये विभागून दोन विमानांनी दिल्लीला पाठविणे हा क्रुरपणा आहे, असे पूर्व दिल्लीच्या ग्राहक मंचाने म्हटले आहे.

स्पाईसजेट या कंपनीने त्यांचे विमान ओव्हरबुक केले होते, असे या घटनेवरून आढळून येते. अन्यथा एकाच कुटुंबातील काही सदस्यांना दुसऱ्या विमानाने पाठविण्यावर कंपनीने भर दिला नसता. परंतु, असे करणे क्रुरता असून व्यवसायविरोधी आहे, असेही मंचाने सांगितले आहे.