नवी दिल्ली - लो कॉस्ट एअरलाइन स्पाइसजेटने पुन्हा एकदा स्वस्त हवाई सफरीची पर्वणी ग्राहकांसाठी सादर केली आहे. नव्या योजनेंतर्गत एका बाजूच्या प्रवासाचे कमीत कमी दर 1299 रुपये राहातील. कंपनीच्या 10 व्या वर्धापन दिनानिमीत्त 23 मे रोजी अशाच दोन ऑफर सादर करण्यात आल्या होत्या.
योजनेतील महत्त्वाचे मुद्दे
>2 जून ते 4 जून रात्री 12 वाजतापासून ऑफर तिकीटांची विक्री सुरु होणार
>20 जून ते 31 जुलैपर्यंतच्या प्रवासासाठी ऑफर तिकीट बुक करता येतील.
>मार्ग : मुंबई-अहमदाबाद, अगरतळा -गुवाहाटी, बंगळुरु कोजिकोड, दिल्ली-जयपुर
>ऑफर अंतर्गत बुक केलेले तिकीट परत करता येणार नाही.
>'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' ऑफरनुसार तिकीटांची विक्री
>ही योजना फक्त देशांतर्गत उड्डाणांसाठीच आहे.
>ऑफर डायरेक्ट, व्हाया किंवा कनेक्टिंग डोमेस्टिक फ्लाइट्सवर उपलब्ध आहे.
>ग्रुप बुकींगवर ऑफर लागू नाही
कंपनी काय म्हणते
कंपनीचे चीप ऑपरेटिंग ऑफिसर संजीव कपूर म्हणाले, आमच्याकडे उत्सव साजरा करण्यासाठी खूप काही आहे. हा सेल आमच्या उड्डाणाची दशकपूर्ती झाली असल्याच्या निमीत्त आहे. भारतीय ग्राहकांना इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त हवाई सफर उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना आणली आहे. तसेच सातव्या तिमाहीत आम्हाला झालेल्या फायदाचाही हा उत्सव आहे.