आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srinivasan And Lalit Modi Battle A New Wikileaks

श्रीनिवासन विरुद्ध ललित मोदी; सुरुवात नव्या विकिलीक्सची!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ललित मोदी व एम. श्रीनिवासन. दोघेही उद्योगपती. हायप्रोफाइल व अतिमहत्त्वाकांक्षी. क्रिकेटच्या राजकारणात आल्यानंतर वादग्रस्त ठरले. तीन वर्षांपूर्वी मोदींना पायउतार व्हावे लागले. श्रीनिवासन खुर्ची सोडण्याच्या सीमारेषेवर आहेत. मोदींना श्रीनी यांनी हटवले. आता मोदींची वेळ आहे. त्यांनी श्रीनींविरोधात जवळपास शेकडो सिक्रेट्स ट्विटरवर अपलोड केले आहेत. शनिवारी त्यांनी ट्विट केले की जर कुणाकडे बीसीसीआयविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर माझ्याकडे द्या. ते सार्वजनिक करण्याची जबाबदारी मी घेतो.

श्रीनिवासनबाबत रोज नव्याप्रकारे खुलासा करताना मोदींनी केलेल्या ट्विट्सचे हा रंजक अहवाल....
मोदीलिक्स । प्रत्येक ट्विटसह अपलोड करतच आहेत बोर्डाचे सीक्रेट डाक्युमेंट्स, इ-मेल. लोकांकडूनही मागवत आहेत.

श्रीनिवासन यांचा भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी धडपड
ललित मोदी @lalitkmodi31 मे मला आताच ही कागपत्रे मिळाली आहेत. मोदींना फसवा, सोनींना ब्लॅकमेल करा.
खुलासा : मोदींवर बीसीसीआयनेच आरोप केला होता की, त्यांनी देश सोडण्यापूर्वी सोनी फेसिलिटेशन फीसच्या नावार 440 कोटी रुपये देण्यास मजबूर केले होते. प्रत्यक्षात श्रीनिवासन यांचेच एक पत्र जारी करून मोदींनी सांगितले की ती रक्कम मीडिया राइट्स लायसन्सची फीस होती.
ललित मोदी@lalitkmodi 28 मे एक दृष्टिक्षेप यावरही
खुलासा : 7 एप्रिल 2009, श्रीनिवास यांना मोदींनी पत्र लिहिले. त्यात त्यांनी त्यांच्या कामात ढवळाढवळ करू नये, असे श्रीनिवासन यांना बजावले. जर त्यांना तसे करायचेच असेल तर आत्यांनीच आयपीएल चालवावे. मला कागदपत्रे व बिलावर स्वाक्ष-या करण्याचे अधिकार बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी असतानाच श्रीनिवासन यांनी दिले होते. सचिव झाल्यावर मात्र ते काढून घेऊ इच्छित होते.
ललित मोदी @lalitkmodi 27 मे इंडिया सिमेंटवाले जे बीसीसीआय ट्रेजरर ऑफीसचा फायदा घेत होते.
खुलासा : एका पत्रात इंडिया सिमेंट्सचे कर्मचारी प्रसन्नाने श्रीनिवासन, त्यांची मुलगी रुपा, जावई गुरुनाथ शिवाय चार अन्य लोकांनी हॉटेलमध्ये बुकींग करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता की, बीसीसीआय ट्रेजरर ऑफीसचे सदस्य म्हणून डीनरमध्ये सहभागी होतील.
ललित मोदी @lalitkmodi30 मे श्रीनिवासन स्वत:च्या जावयाला शिक्षा देऊ शकतील काय?
खुलासा : 14 पानी कागदपत्रे. यात तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर व सचिव एन. श्रीनिवासनद्वारे तयार केलेली नियमावली आहे. यात नियम 3.1.1 नुसार खेळाडू किंवा मॅनेजमेंटपैकी कुणी फिक्सिंगमध्ये सहभागी असेल तर त्यासाठी त्याला प्रोत्साहन देणा-या आरोपींवर पाच वर्षे किंवा तहहयात बंदी. तसेच कोणत्याही स्वरुपाचे वेतन, भत्ते रोखण्याची तरतूद आहे.
ललित मोदी @lalitkmodi 30 मे हे ब्लॅकमेल मीटिंगचा एक भाग आहे. यात सोनीसाठी एक प्लॅन तयार केला गेला होता.
खुलासा : आणखी एक कागदपत्र जारी. मोदीला हटवण्यासाठी साथ न दिल्याबद्दल सोनीच्या प्रसारणाचे हक्क काढून घेण्यास सांगण्यात आले होते. तसाठी त्यांच्यावर घोटाळे, नियमांचे पालन न करणे यासारखे आरोप ठेवण्याची धमकी बोर्डाने दिली होती. याशिवाय इतर कठोर पावले उचलण्याबाबतही विचार झाला.
ललित मोदी@lalitkmodi27 मे कसे मी श्रीनीच्या मोठ्या योजनांमध्ये अडथळा ठरत होतो.
खुलासा : बीसीसीआयच्या काही पदाधिका-यांना पाठवलेले श्रीनिवासन यांचे एक पत्र जारी करून मोदींनी सांगितले की, 2009 मध्ये कसे श्रीनिवासन स्वत: भारतीय क्रिकेट टीमचे टूर प्लॅन करत होते. प्रत्येक निर्णय तेच घेत होते. खरे तर त्यावेळी प्रोग्राम टूर कमेटीचे अध्यक्ष मोदी होते. आक्षेप घेतला तर बीसीसीआय अध्यक्षांच्या निर्णयाचा हवाला देत होते.
ललित मोदी @lalitkmodi 26 मे
बीसीसीआय-आयपीएल ओनर मीट. जाणून घ्या सीएसकेचे मालक कोण आहे?
खुलासा । 24 जून 2010 ला आयपीएल, बीसीसीआय व फ्रँचॅझी ओनरच्या बैठकीच्या मिनिट्सचे दस्तऐवज जारी करताना सांगितले की, त्या बैठकीत श्रीनिवासन बीसीसीआय सचिव चेन्नई सुपर किंग्जचे मालक या नात्याने सहभागी झाले होते.
ललित मोदी@lalitkmodi25 मे
श्रीनी व त्यांच्या लोकांनी हे लक्षात घ्यावे की माझ्याकडे 100 पत्रे आहेत. आयपीएलशी संबंधित. अगदी पहिल्या दिवसांपासून. मी ते येथे टाकू शकतो.
खुलासा : एका डॉक्युमेंटमध्ये नारायस्वामी, श्रीनिवासन व त्यांची पत्नी चित्रा आपला मुलगा अश्विनच्या नावे स्वीर्त्झलंडमधील एक ट्रस्ट बेल्थार्न इन्व्हेस्टमेंट ग्रुपमध्ये 100 डॉलरचे पाच हजार शेअर्सचे नामांकन आहे. या कागदपत्रांवर अश्विनची स्वाक्षरी आहे. पण तारीख नाही.
ललित मोदी @lalitkmodi 25मे त्यांना माझ्या कामात हस्तक्षेप करण्यास त्यांना मजा वाटते. त्यात त्यांचा स्वार्थही आहे.
खुलासा : श्रीनिवासन यांचे एक पत्र जारी केले. त्यात असे स्पष्ट होते की श्रीनिवासन यांनी बीसीसीआय सचिव व आयपीएल अधिका-यांशी चर्चा करताच स्पर्धेसाठी अंपायर्सची नावे निश्चित केली होती.
एन. श्रीनिवासन, वय 68 वर्षे
बीसीसीआय अध्यक्ष, माजी सरचिटणीस, माजी कोशाध्यक्ष
इंडिया सिमेंट, चेन्नई सुपरकिंग्ज
15 हजार कोटी रुपये
मयप्पन सट्टेबाजीच्या आरोपात अडकले, समलैंगिक मुलाला पोलिसांकरवी बदडले, घरातूनही हाकलले
ललित मोदी, वय 49 वर्षे
इंडियन क्रिकेट लीगचे माजी कमिशनर
मोदी एंटरटेनमेंट नेटवर्क, गॉडफ्रे फिलिप्स, मोदी एंटरप्राइझेस
4 हजार कोटी रुपये
तीन आयपीएल फ्रँचायझींमध्ये नकली कंपन्यांच्या माध्यमातून शेअर्सची खरेदी करणे