आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srinivasan Gives Hints For Resign But With Some Condtions

श्रीनिवासन यांच्याकडून प्रथमच राजीनाम्याबाबत संकेत, पण घातल्या अटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन अडकल्याने मागील दहा-पंधरा दिवसापासून श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मात्र पहिल्या दिवसापासून राजीनाम्यास नकार देणा-या श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत.
मात्र त्यांनी त्यासाठी बीसीसीआयमधील त्यांच्या बाजूच्या संघटना, सदस्यांना अटी घातल्या आहेत.

नागपूरचे व बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहिलेले शशांक मनोहर किंवा बीसीसीआयच्या बाहेरचा नविन अध्यक्ष असता कामा नयेत. तसेच ज्या गोष्टीवरून सध्याच्या कार्यकारिणीतील खजिनदार अजय शिर्के आणि सचिव संजय जगदाळे यांना नव्या कार्यकारिणीत सामील करून घेऊ नये. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे अरूण जेटलीकडे सोपविण्यास तयार आहेत. मात्र आपण नाममात्र अध्यक्षपदी राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, श्रीनिवासन यांच्या विरोधात देशातील 31 पैकी संघटना/सदस्यांपैकी किमान 18-20 जण विरोधात असल्याचे सांगण्यात येते. श्रीनिवासन यांच्यामागे भक्कमपणे पाठीशी उभे राहणारे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणी मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येते. दिल्लीकर जेटली व शुक्ला या जोडीने श्रीनिवासन यांचा काटा काढण्याचे ठरवल्यानंतर भाजपचे मोठे नेते असलेल्या जेटलींचा शब्द अनुराग ठाकूर मोडू शकले नाहीत. त्यामुळेच ठाकूर यांनी मध्यस्थी सद्यस्थिती शांत करण्यासाठी एक फॉर्मुला तयार केला असून, त्यामुळे श्रीनिवासन जेटलीकडे अध्यक्षपद देण्यास तयार झाले असल्याचे सांगण्यात येते. जेटली जरी कार्यकारी अध्यक्ष झाले तरी आपली मुदत संपेपर्यंत नाममात्र अध्यक्ष म्हणून आपल्याला ठेवावे, अशीही अट श्रीनिवासन यांनी घातली आहे. याबाबतची बैठक उद्या चेन्नईत अडीच वाजता होणार आहे.