आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srinivasan Will Step Aside For Fair Probe: BCCI To SC

श्रीनिवासन यांचीसद्दी संपली, सुनील गावसकर अध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बीसीसीआयवरील एन. श्रीनिवासन यांची सद्दी शुक्रवारी तात्पुरती संपुष्टात आली. आयपीएल फिक्सिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार श्रीनिंना पद सोडावे लागले. त्या जागी मंडळाचे आता 2 प्रमुख असतील.

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष शिवलाल यादव या दोघांवर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स या संघांना आयपीएल-7 मध्ये खेळण्याची सूट न्यायालयाने दिली. गावसकर मंडळाचे हंगामी अध्यक्ष असतील. त्यांच्यावर आयपीएल-7शी संबंधित जबाबदारी असेल. यादव यांच्याकडे आयपीएल वगळता इतर कामकाज पाहण्याची जबाबदारी सोपवली आहे. फिक्सिंगच्या चौकशी, सुनावणीपर्यंत ही व्यवस्था लागू असेल. श्रीनिंच्या इंडिया सिमेंटशी संबंधित एकही व्यक्ती मंडळावर असणार नाही. न्यायमूर्ती ए. के. पटनायक आणि न्यायमूर्ती एफ. एम. इब्राहिम कलिफुल्ला यांच्या न्यायपीठासमोर ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी 16 एप्रिल रोजी होत आहे.