आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीसंतचे आठ किलो वजन घटले, फादरला म्हणाला मला 'मुक्ती' द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तिहार जेलमध्ये मोठ्या जिकारीने वेळ काढत असलेला श्रीसंतला आता आपले जुने चांगले दिवस आठवू लागले आहेत. त्याला जेलमध्ये फार भीती वाटते व भीतीमुळे तो थर-थर कापतो. जेव्हा त्याला एखादा नातेवाईक किंवा परिचित भेटायला जातो तेव्हा ढसा- ढसा रडतो. अशीच घटना गुरुवारी घडली. जेव्हा श्रीसंतचे गुरु व फादर जॉन पुथुवा त्याला भेटण्यासाठी गेले तेव्हा श्रीसंत त्यांच्या गळ्यात पडून ओक्सा-बोक्सी रडू लागला. तसेच त्याने फादरकडे विनंती केली यातून माझी मुक्ती करा. फादर जॉन श्रीसंतला पहिल्यांदा तेव्हा भेटले होते जेव्हा तो पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार होता. तेव्हापासून श्रीसंत या फादरला भेटतो व आशीर्वाद घेतो. विशेषत त्याने गुरुवारी आपल्या गुरुकडे खास आशीर्वाद मागितला. श्रीसंतची आई सावित्री देवी दर आठवड्याला आपल्या घरी फादर जॉन यांना बोलवून प्रार्थना करते. गुरुवारी जेव्हा तिहार जेलमध्ये ते श्रीसंतला भेटायला गेले तेव्हा तो म्हणाला, 'फादर, माझ्यासाठी प्रार्थना करा. मला मुक्ती द्या.

फादर यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, जेलमध्ये मी जेव्हा पाऊल ठेवले आणि श्रीसंत माझ्याजवळ येऊन माझे हात धरले व मोठ-मोठ्याने रडू लागला. तो म्हणाला, मी हे काय करून बसलो ज्यामुळे मला येथे यावे लागले आहे. पण मी निर्दोष आहे. माझ्यासाठी सगळ्यांना प्रार्थना करण्यास सांगा. मी कधीही जेलमध्ये गेलो नव्हतो तसेच मी काहीही वाईट केले ज्यामुळे मला येथे रहावे लागेल.

फादर यांनी नंतर सांगितले की, जेलमध्ये श्रीसंतचे वजन सुमारे 8 किलो कमी झाले आहे. त्यादिवशी तर त्याने नाश्‍ताही केला नव्हता. जेव्हा फादर यांनी त्याला त्यांच्यासोबत काही खाण्यास सांगितले तेव्हा श्रीसंतने एक ग्लास शीतपेय घेतले.