आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआरपीएफच्या कार्यालयाला आग, हेड कॉन्स्टेबलचा होरपळून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कार्यालयात शुक्रवारी उशिरा रात्री लागलेल्या आगीत एका हेड कॉन्स्टेबलचा होरपळून मृत्यू झाला. रात्रीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते.

आर. के. पुरम येथील कार्यालयात इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग सेंटरला (इडीपी सेल) शुक्रवारी उशिरा रात्री आग लागली होती. रात्री १.२० च्या सुमारास ४२ वर्षीय हेड कॉन्स्टेबल लिंगम गौडा यांनी रेकॉर्ड रूमला आग लागल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सात जवानांनी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले होते. परंतु घटनेत गौडा खोलीत अडकून पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आगीत सीआरपीएफ जवानांचे वेतन आणि वैयक्तिक तपशील असलेल्या कागदपत्रांचे किती नुकसान झाले हे मात्र समजू शकले नाही.
आयटी प्रयोगशाळेत आग
सीबीआयच्या दिल्ली मुखालयातील माहिती तंत्रज्ञानविषयक प्रयोगशाळेला शनिवारी आग लागली. त्यात प्रयोगशाळेतील महत्त्वाचे दस्तएेवज जळून खाक झाले. आग विझवण्यात आली आहे. सीजीआे कॉम्प्लेक्समध्ये सीबीआयचे हे दिल्ली मुख्यालय आहे. आगीचे कारण शॉर्टसर्किट सांगण्यात आले.