आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली विद्यापीठात Ph.D करणा-या तरूणीचे प्राध्यापकाने केले लैंगिक शोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधील एका विद्यार्थिनीने कॉलेजच्या एका असिस्टंट प्रोफेसरवर लैंगिक शौषण केल्याचा आरोप केला आहे. संबंधित पीडिता विद्यार्थिनीने हा ही आरोप केला आहे की, जेव्हा याप्रकरणी कॉलेजच्या मॅनेजमेंटकडे तक्रार करण्यात आली तेव्हा प्राचार्यांनी त्या असिस्टंट प्रोफेसरला वाचविण्याचा प्रयत्न केला.
कॉलेजमधील केमिस्ट्री डिपार्टमेंटचे सहाय्यक प्रोफेसर सतीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करीत असलेल्या पीडीत तरूणीने आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडीत तरूणीने सतीशकुमार यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचे म्हटले आहे. डीसीपी उत्तर मधुर वर्मा यांनी सांगितले की, "आरोपी कुमार यांच्याविरोधात कलम 354 आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या पीडीतेने असाही आरोप केला आहे की, प्रोफेसर कुमार यांनी सलफ्यूरिक अॅसिडने जाळण्याची धमकीही दिली होती.
प्राचार्यावरही आरोप-
पीडीत तरूणीने आपल्या तक्रारीत कॉलेजचे प्राचार्य वाल्सन थंपू यांच्यावरही धमकावल्याचा आरोप केला आहे. जर तुला पीएचडी ठरल्या वेळेत पूर्ण करायची असेल तर वाद वाढवू नको, हे प्रकरण कॉलेज पातळीवरच मिटवं असा धमकीवजा सल्ला प्राचार्य थंपू यांनी दिल्याचे तरूणीने म्हटले आहे. याबाबत लेखी निवेदन लिहून देण्याचाही दबाव वाढविला. या तरूणीने म्हटले आहे की, मी जेव्हा या प्रकरणाबाबत कॉलेजच्या व्यवस्थापनाकडे गेले त्यानंतर आरोपी कुमार याने माझ्या आई-वडिलांना संपर्क साधून माफी मागितली. तसेच भविष्यात असे काही होणार नाही याची हमी देत राहिले.
कॉलेजने म्हटले, चौकशी सुरू-
थंपू यांनी पीडीत तरूणीने तक्रार दाखल केल्याला दुजारो दिला. मात्र, आपण सतीश कुमार यांना वाचविण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही असे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण कॉलेजच्या अंतर्गत तक्रार समितीकडे पाठविले गेले आहे व तेथे चौकशी सुरु आहे. थंपू यांनी सांगितले की, संबंधित तरूणीने माझ्यासमोरच हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी आपण तरूणीला लैंगिक शोषणाची तक्रार दाखल न करण्याची विनंती केली. मात्र, पीएचडी वेळेत कशी पूर्ण करता येईल याबाबत चर्चा करण्याचा सल्ला दिला होता.
बातम्या आणखी आहेत...