बीजिंग - भारताशी सुरू असलेल्या सिक्कीम सीमावादाच्या दरम्यान चिनी मिलिटरीने तिबेटमध्ये 11 तासांची युद्ध कवायत केली आहे. PLA (पीपल्स लिबरेशन आर्मी) ने साउथवेस्ट चायनाच्या तिबेट स्वायत्त प्रांतात ही कवायत केली. तथापि, सिक्कीम सेक्टरच्या डोकलाम परिसरात 30 दिवसांपासून भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने ठाकले आहे. हा परिसर एक ट्राय जंक्शन (तीन देशांच्या सीमा एकत्र येणारी जागा) आहे. चीन येथे रस्ता बनवू इच्छितो, पण भारत आणि भूतानने याला विरोध केला आहे.
- सरकारी चायना सेंट्रल टेलिव्हिजन (CCTV)ने 14 जुलैच्या आपल्या रिपोर्टमध्ये या ड्रिलबाबत माहिती दिली. तथापि, कवायतीची ही वेळ योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.
- ग्लोबल टाइम्सने सोमवारी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, पीएलएच्या तिबेट मिलिटरी कमांडच्या ब्रिगेडने या ड्रिलमध्ये सहभाग घेतला, ही ब्रिगेड चीनच्या पर्वतीय ब्रिगेडपैकी सर्वात महत्त्वाची आहे.