आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिसूचनेवर दिल्ली सरकार सल्ला घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. बदली आणि नेमणुकीचे अधिकार नायब राज्यपालांकडे आहेत, अशा आशयाची अधिसूचना केंद्राने शुक्रवारी जारी केली होती. त्यावर दिल्ली सरकार आता घटनातज्ज्ञांशी चर्चा करत आहे, जेणेकरून अधिसूचनेला न्यायालयात आव्हान देणे शक्य होईल.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिसूचनेची तुलना स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्लंडची महाराणी आणि व्हाइसराॅय यांच्याशी केली होती. नायब राज्यपाल व्हाइसराॅय आणि पंतप्रधान कार्यालय ब्रिटनची महाराणी आहे, असा आरोप त्यांनी केला होता. परंतु केजरीवाल यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देण्याची काहीही गरज वाटत नाही. केवळ नौटंकी करत आहेत. आमचा नाटकावर विश्वास नाही. केवळ सरकारवर आहे, असे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. दरम्यान, सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांच्या म्हणण्यानुसार ही अधिसूचना घटनाबाह्य आणि बेकायदा आहे. अधिसूचना जारी करण्यापूर्वी राष्ट्रपतींची परवानगी घेण्यात आलेली नाही.
बातम्या आणखी आहेत...