आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Starvetion Possibility On World Due To Global Warming

हवामान बदलामुळे जगावर उपासमारीची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वर्ष २०५० पर्यंत हवामान बदलाची हीच स्थिती राहिली तर जगावर उपासमारीची आपत्ती ओढवू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्राच्या सूत्रांनी दिला आहे. कुपोषण व उपासमारीचा धोका २०% वाढण्याची शक्यता असून यात कोट्यवधी लोकांची अन्नान्नदशा होईल, असे भाकीत संस्थेने वर्तवले आहे. युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रॅमने (डब्ल्यूएफपी) कुपोषणाच्या कारणांवर संशोधन केले. त्यात हवामान बदलामुळे पूर, दुष्काळजन्य स्थितीची वारंवारिता वाढत असल्याने उत्पादकता घटत असल्याचे म्हटले आहे. जमीन व पाणी प्रदूषणही भयावह रूप धारण करत असल्याने नैसर्गिक शेती दुर्मिळ होत चालली आहे.

पॅरिस येथे होणा-या जागतिक पर्यावरण करारात काही ठोस उपायांवर काम सुरू करण्याची निकड डब्ल्यूएफपीने वर्तवली आहे. याचा कृती कार्यक्रम सुरू झाला नाही तर जागतिक अन्नव्यवस्था कोलमडून पडेल. प्रत्येक देशाने व नागरिकाने यात योगदान देण्याची वेळ आली आहे, असा इशारा संस्थेने दिला आहे. याचा सर्वात मोठा फटका महिला व मुलांना बसेल. हे दोन घटक सर्वाधिक कुपोषणाचे बळी असल्याने त्यांच्यावर याचा परिणाम होईल. पिकांच्या सकसतेवर व दर्जावर हवामान बदलाचा मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे. शेतीवर उदरनिर्वाह असणा-यांची अर्थव्यवस्था यामुळे कोलमडत असताना यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज डब्ल्यूएफपीने व्यक्त केली आहे. पॅरिस करारातून सर्व देशांनी इच्छाशक्तीने सहमती करावी.