आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशेल आणि सोनिया डिनरमध्ये दिसल्या सोबत, पाहा राष्ट्रपती भवनातील Inside Photo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या स्टेट डिनरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. डिनर टेबलवर त्यांनी मोदींच्या कार्यपद्धतीचीही स्तुती केली. मोदी हे मजबूत पंतप्रधान असून ते बरेच स्टाइलिशही आहेत, असे ओबामा यावेळी म्हणाले.

रविवारी रात्री अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान ओबामा आणि मिशेल पूर्णपणे भारतीय अंदाजात दिसून आले. स्वतः पाहुणे असूनही त्यांनी डिनरमध्ये आमंत्रितांना हात जोडून अभिवादन केले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याबरोबर उभे राहून त्या त्या सर्वांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मोदींशिवाय यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी, सुमित्रा महाजन, एल.के.आडवाणी यांच्यासह 250 जणांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. देशातील बडे उद्योगपतीही यावेळी उपस्थित होते. रतन टाटा आणि मुकेश अंबानी यांनी बराच वेळ ओबामांबरोबर चर्चा केली.

असा होता मेन्यू
डिनरच्या मेन्यूमध्ये गलौती कबाब, सुफियाना फिश टिक्का आणि चिकन मलई टिक्का यांचा समावेश होता. शाकाहारी पदार्थांमध्ये दही कबाब, तंदूरी मशरूम, हरियाली कबाब होते. तर डिनरमध्ये ब्रोक्ली आणि वॉलनट सूप, मस्टर्ड फिश करी, मटन रोगन जोश, चिकन कोरमा, आचारी पनीर, कढी पकोडा, पुलाव सर्व्ह करण्यात आले.

पुढे पाहा, स्टेट डिनरचे Inside Photos