नवी दिल्ली- पर्यावरणाचा ऱ्हास अाणि राज्यातील कमी हाेत असलेल्या वनक्षेत्राच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वनक्षेत्र वाढविण्याची धडक माेहीम हाती घेण्यात अाली आहे. या माेहिमेचा शुभारंभ 1 जुलै राेजी करण्यात येत अाहे. या एकाच दिवशी दाेन काेटी झाडे लावली जाणार असून माेहिमेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना निमंत्रण देण्यात अाले अाहे.
राज्याचे वन वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेऊन त्यांना वृक्षाराेपण अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानाला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या अाहेत. परंतु जुलै राेजी सुरू हाेणाऱ्या या अभियानात सहभागी हाेण्यासाठी त्यांनी अद्याप हाेकार दिलेला नाही. जुलै राेजी दाेन काेटी झाडे लावण्याची तयारी डिसेंबरपासूनच करण्यात अालेली अाहे. खड्डेही तयार अाहेत. दीड कोटी रोपटे हे वन क्षेत्रात लावले जातील तर ५० लाख रोपटे शाळा, सरकारी कार्यालये, मैदान आदी ठिकाणी लावण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमातंर्गत लावण्यात येणाऱ्या रोपट्यांची देखभाल संरक्षण लोकसहभागातून केली जाणार अाहे. या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप देऊन हा उपक्रम यशस्वी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यात इकाे बटालियन!> मराठवाड्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता अासाम, राजस्थाप्रमाणे इकाे बटालियन स्थापण्यात येणार
> राज्यात दुसरी सैनिकी शाळा चंद्रपूर मध्ये उभारण्यास संरक्षण मंत्री मनाेहर पर्रीकरांची मान्यता
> रेल्वेच्या हजार मालमत्तांवर वृक्षारोपण करणार
> सेवाग्रामच्यागांधी फॉर टुमारो उपक्रमासाठी तसेच सिंधुदूर्ग, रायगड किल्ल्यांसाठी निधीची मागणी.
वारीतील भाविकांना रोपे भेट द्या : नरेंद्र मोदींची सूचना
दरवर्षी होणाऱ्या पंढरपूरच्या वारीत भाविकांना प्रसादाच्या रुपात एक रोपटे भेट द्यावे, मुंबई लोकल रेल्वेच्या दुतर्फा असणाऱ्या मोकळ्या जागेवर महिला बचत गटांना रोपवाटीकांचे कामे द्यावीत अशा सूचना पंतप्रधान माेदी यांनी केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार यांंनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. जावडेकर यांनी कॅम्पा अंतर्गत वनीकरणासाठी १९६ काेटी रुपये राज्याला दिले. पुढील ३वर्षात २००० काेटी रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.