आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Ready To Marketing Of Puran Poli And Wadapao Also In The World

राज्य सरकार जगभर करणार पुरणपोळी, वडापावचे मार्केटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पुरणपोळी आणि वडापावसारख्या मराठमोळ्या खाद्यपदार्थांचे राज्य सरकार देशासह जगभरात मार्केटिंग करणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिव वल्सा आर. नायर सिंह यांनी सांगितले की, देश-विदेशात ज्याप्रमाणे इडली, दोसा या पदार्थांना मागणी आहे, तशीच पुरणपोळी व वडापावला देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी देश-विदेशातील हॉटेल्स, कॅटरिंग इन्स्टिट्यूटसोबत करार केला जाईल.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिल्ली हाटमध्ये १५ दिवसांपासून सुरू असलेल्या ‘महाजत्रा’ या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, हस्तकला व लघु उद्योगाचे दर्शन घडवणाऱ्या महोत्सवाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.