आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला धोका असेल तर आधी ठरलेल्या गोष्टींचा विचार नाही, अणुहल्ल्याबाबत पर्रिकरांचे वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आधी अणुहल्ला न करण्याच्याच्या भारताच्या धोरणावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. भारताने आधी अण्वस्त्राचा वापर न करण्याच्या पॉलिसीत का अडकून राहायचे? देशावर जेव्हा एखादा धोका निर्माण झालेला असेल, तेव्हा अशा जुन्या धोरणांबाबत नक्कीच विचार करणार नाही, असे मत संरक्षण मंत्री पर्रिकर यांनी स्पष्टपणे मांडले. त्याचवेळी हे आपले खासगी मत असल्याचेही पर्रिकर यांनी सांगितले.

धोरण पाळणे म्हणजे आपलीच शक्ती कमी करणे...
- संरक्षण मंत्री पर्रिकर गुरुवारी एका कार्यक्रमात म्हणाले की, आधीच ठरलेल्या धोरणानुसार वर्तन केले किंवा तुम्ही अण्वस्त्राबाबत एखाद्या भूमिकेवर कायम राहिले तर आपण अण्वस्त्राची शक्ती गमावून बसू असे मला वाटते.
- कोणीही तुमच्याबाबत आधीच अंदाज लावू शकणार नाही. हा स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. पण काही गोष्टी आधीच ठरलेल्या असायला हव्यात. त्यामुळे आपल्याला पुढे जात राहता येते.
- आम्ही जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहोत आणि बेजबाबदारपणे आम्ही याचा वापर करणार नाही, असे आपण का म्हणून शकत नाही.
- न्यूक्लियर पॉलिसीबाबतच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना पर्रिकर यांनी हे मत मांडले.

संरक्षण मंत्रालयानेही ठरवलेस खासगी मत..
- संरक्षण मंत्रालयानेही पर्रिकर यांचे हे वक्तव्य त्यांचे खासगी वक्तव्य असल्याचे म्हटले आहे. ही मंत्रालयाची भूमिका नसल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
- न्युक्लियर टेस्टनंतर भारताने अण्वस्त्राचा वापर आधी करणार नाही, अशे आश्वासन जगाला दिले होते.

काँग्रेसचा विरोध..
- दरम्यान, काँग्रेसने पर्रिकरांच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे.
- काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा म्हणाले की, पर्रिकर न्युक्लियर आर्सेनलचे एक्सपर्ट बनले आहेत. त्यांचे वक्तव्य देशाच्या अणुधोरणाच्या विरोधात आहे.
पुढे वाचा, आणखी काय म्हणाले मनोहर पर्रिकर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्षे तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्षे तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...